Nashik News Saam tv
महाराष्ट्र

PM Jeevan Jyoti Policy Scam : नाशिकमध्ये राष्ट्रीयकृत बँकेत २ कोटी १२ लाखांचा अपहार; विमा धारकांचे दाखविले बोगस वारसदार

Nashik News : नाशिकमधील पंजाब नॅशलन बँक कॅनडा काॅर्नर शाखा येथे हा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: बँकेत बनावट खाते उघडून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र एका राष्ट्रीयकृत बँकेत विमा धारकांचे तोतया वारसदार दाखवून विमा योजनेत अपहार केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. यामध्ये तब्बल २ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. 

नाशिकमधील (Nashik News) पंजाब नॅशलन बँक कॅनडा काॅर्नर शाखा येथे हा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये बँक व्यावस्थापक लतिका कुंभारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुलै २०२२ ते आजपर्यंत पंजाब नँशनल बँकेत (Bank) हाॅल इनचार्ज पदावर कार्यरत असलेला संशयित दिपक कोळी (रा. बेडे काॅलनी, भुजबळ फार्म) याने पदाचा दुरपयोग करत हा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

बँक व्यवस्थापकाकडून पोलिसात तक्रार 

दीपक कोळी याने बनावट कागदपत्राच्या अधारे बँक खातेदारांच्या १०६ तोतया वारसदार दाखविले. इतकेच नाही तर त्यांच्या नावे बँकेत खाते उघडून पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतील दाव्याची रक्कम बोगस वारसदारांच्या खात्यात वर्ग करत अपहार केला आहे. यामध्ये बँकेची आणि विमा कंपनीची तसेत मयत खातेदारांच्या वारसदारांची फसवणूक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दिली आहे. 

संशयिताला अटक करत पावणे दोन कोटींची रिकव्हरी 

दरम्यान पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या २ कोटी १२ लाखांच्या रकमेचा अपहार करणाऱ्या बँकेत हाॅल इन्चार्ज पदावर असलेल्या कर्मचाऱ्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली असून सरकारवाडा पोलिसांनी तपासादरम्यान जवळपास १ कोटी ७० लाखांची रिकव्हरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT