Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : ११ वर्षीय मुलावर बिबट्याची झडप; डबा फेकून मारताच बिबट्याने ठोकली धूम

Nashik News : अभिषेकने आरडाओरड करत घराच्या दिशेने धाव घेतली. त्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकही धावले

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नदीच्या परिसरात गेलेल्या एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पत्र्याचा (Nashik) डबा बिबट्याच्या दिशेने ताकदीने भिरकावल्याने बिबट्याने धूम ठोकली. यामुळे किरकोळ दुखापतीवर वन्यप्राण्याचा हल्ला (Leopard Attack) निभावून गेला. ही घटना नाशिक रोड वालदेवी नदीकाठाजवळ असलेल्या पिंपळगाव खांब परिसरात रविवारी (१० डिसेंबर) दुपारीच्या सुमारास घडली. (Maharashtra News)

अभिषेक सोमनाथ सारसकर असे मुलाचे नाव असून अभिषेक हा बालंबाल बचावला. शौचासाठी अभिषेक सारसकर हा वालदेवी नदीकाठाच्या दिशेने गेला होता. तेथे बिबट्याने त्याच्यावर पाठीमागून चाल केली. यावेळी कमरेला पंजाचे नखं लागल्याने दुखापत झाली. अभिषेक याने घाबरून न जाता प्रसंगावधान राखत जवळ असलेला पत्र्याचा डबा बिबट्याच्या अंगावर वेगाने भिरकावला. यामुळे बिबट्याने परिसरातील झाडीझुडपात धूम ठोकली. काही दिवसांपासून वडनेरगेट, विहितगाव, पिंपळगाव खांब, पाथर्डी रोड या भागातील शेतशिवारात बिबट्यांचा संचार वाढू लागला आहे. त्यामुळे परीसरातील नागरिकांना सतर्क रहाण्याचे सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुत्र्यावरही केला हल्ला 

यावेळी अभिषेकने आरडाओरड करत घराच्या दिशेने धाव घेतली. त्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकही धावले. अभिषेकने घडलेला प्रकार सांगितला असता त्याची आई आरती सारसकर यांनी तातडीने त्याला नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या कमरेजवळ किरकोळ जखम झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अभिषेक बालंबाल बचावला. काही वेळानंतर त्याच परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. या घटनेचा सीसीटीव्ही विडिओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

SCROLL FOR NEXT