Soldier Saam Tv
महाराष्ट्र

Nandgaon Soldier: नांदगावच्या मांडवडमधील जवानाला लेह-लडाखमध्ये वीर मरण

Nandgaon Soldier: भारतीय सैन्य दलातील जवान संदीप मोहिते काश्मीरच्या लेह लडाख भागात कार्यरत होते. लष्करात ते १०५ इंजिनियर रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर ते कार्यरत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय सोनवणे मनमाड (नाशिक)

Nandgaon Soldier Martyred in Leh Ladakh :

नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या मांडवड गावातील जवान संदीप मोहिते यांना वीर मरण आले आहे. भारतीय सैन्य दलातील जवान संदीप मोहिते काश्मीरच्या लेह लडाख भागात कार्यरत होते. लष्करात ते १०५ इंजिनियर रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर ते कार्यरत होते. कर्तव्यावर बजावत असताना त्यांना अपघात झाला त्यात त्यांना वीरमरण आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. (Latest News)

मोहिते यांच्या पश्चात त्यांच्या घरी आई - वडील, पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मांडवड गावासह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरलीय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमळनेरमधील जवानाला वीर मरण

अमळनेरमधील जवानालाही मे २०२३ मध्ये वीर आले होते. लोण (ता. अमळनेर) येथील लिलाधर नाना पाटील (वय ४२) हे आसाममधील गुवाहाटी येथे सैन्यदलात नोकरीला होते. बदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या आर्मीच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यात लिलाधर पाटील यांचे वीर मरण आले होते.

लिलाधर नाना पाटील (वय ४२) हे आसाममधील गुवाहाटी येथे सैन्यदलात नोकरीला होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी दोन वर्षे वाढवून घेतले होते. आसामहून ४०० किलोमीटरवर असलेल्या अरुणाचल प्रदेशात त्यांची बदली झाली होती. आर्मीच्या ट्रकमध्ये २० जणांची तुकडी नेली जात होती. लिलाधर हे मागे बसले होते. पहाडी रस्त्यात अचानक ट्रकचे मागील फाटक तुटल्याने लिलाधर पाटील हे खाली पडले. यात त्‍यांना दगडाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मालेगाव पोलीस दलातील आयना डॉग रिटायर

संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकच्या मालेगावमधील बी. डी. एस म्हणजेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात गेल्या १० वर्षापासून कार्ययरत असणारी आयना नावाची डॉग ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाली आहे. गेल्या दहा वर्षात आयनाने नाशिकच्या ग्रामिण भागात अनेक ठिकाणी घडलेल्या दरोडे, चोरीच्या घटनांचा शोध लावण्यात आपली महत्वाची भूमिका बजावली आहे. तिच्या सेवानिवृर्तीनंतर तिला जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशानंतर खासगी मालकास देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT