Nashik : मुल्हेरच्या मंदीरात ऐतिहासिक रासक्रिडा उत्सवाला सुरुवात! अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik : मुल्हेरच्या मंदीरात ऐतिहासिक रासक्रिडा उत्सवाला सुरुवात!

नाशिक जिल्हयातील मुल्हेरच्या उध्दव महाराज समाधी मंदीरात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या रासक्रिडा उत्सवाला संध्याकाळपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिक जिल्हयातील मुल्हेरच्या उध्दव महाराज समाधी मंदीरात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या रासक्रिडा उत्सवाला संध्याकाळपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. आश्विन शुध्द पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा रासक्रीडा उत्सव मुल्हेरमध्ये संपन्न होतो. भारतात मथुरेनंतर केवळ महाराष्ट्रातील मुल्हेरमध्येचं रासक्रीडा उत्सव साजरा केला जातो. आज संध्याकाळी संपत काळात रास चक्र रासस्तंभावर चढवण्यात आल्यानंतर उत्सवाला सुरुवात झालीय. पहाटेपर्यंत हा उत्सव असाच सुरू राहील. गेल्या 700 वर्षांपासून मुल्हेरमध्ये रासक्रीडा उत्सव साजरा केला जातो. या रासक्रीड्रा उत्सवाचं वैशिष्ट्यं म्हणजे 25 फुट व्यासाचं केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजवलेलं मोठे चक्र, दोरीच्या सहाय्याने विशिष्ठ प्रकारची गाठ बांधून तयार करण्यात येतं.

हे देखील पहा :

आकाशात चंद्र आणि सूर्याच्या उपस्थितीत म्हणजेच संपतकालात ते रासस्तंभावर चढवण्यात येतं. यावेळी जमलेल्या हजारो भाविकांचे हात चक्र चढविण्यासाठी सरसवतात आणि उध्व महाराज की जय च्या घोषात पाहता पाहता रासचक्र स्तंभावर चढवलं जातं. त्यानंतर साडे नऊनंतर मुख्य भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. उध्दव महाराजांच्या वंशातील मुलाला कृष्ण बनवण्यात येऊन त्याची मंदीरापर्यंत मिरवणूक काढण्यात येते.

त्यानंतर रासचक्रात आण्यात आल्यावर नवसपूर्ती करणारे भाविक आपल्या मुलाला अथवा मुलीली गोप-गोपिका बनवून रासचक्रात बसवतात. संपुर्ण रात्रभर ब्रजभाषेतील भजन म्हटली जातात. हा कर्यक्रम दुस-या दिवशी सकाळ पर्यंत सुरु असतो. संपुर्ण रात्रभर सारंग, तोंडी, मालकस, कानडा, केदार, यजवंती, रामकलीभूप यासह सामेरी, मालगौडा,अनवट अशा विविध रागांचं  गायन केलं जातं. रात्रभर 105 भजनं गायली जातात. त्यानंतर सकाळी कृष्ण-राधेचा खेळ होऊन त्यांना परत  पाठवण्यात येतं. त्यावेळी जड अंतकरणानं शेवटचं भजन होऊन रासस्तंभावर चढवलेलं रासचक्र पुन्हा खाली उतरवण्यात येतं आणि उत्सवाची सांगता होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT