Onion Export Ban Saam tv
महाराष्ट्र

Onion Export Ban : कांदा लिलाव ठप्प; निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर

Manmad Nashik News : शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा काढणीस सुरवात झाली आहे. यामुळे सध्या नविन लाल कांद्याला ३ हजाराच्या दरम्यान भाव मिळत होता

Rajesh Sonwane

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविल्याने त्याचे तीव्र पडसाद (Nashik) उमटू लागले आहेत. शेतकरी आक्रमक झाल्याने लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील (Onion) कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. तर चांदवड बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे. (Tajya Batmya)

शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा काढणीस सुरवात झाली आहे. यामुळे सध्या नविन लाल कांद्याला ३ हजाराच्या दरम्यान भाव मिळत होता. कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णया घेतल्याने त्याचा परिणाम शेतकरी व व्यापाऱ्यांना बसणार आहे. तर सद्यपरिस्थितीला आवक कमी असल्याने सध्या दरात तेजी असली तरी पुढील काही दिवसात आवक वाढणार असल्याने भाव कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको 

कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी कांदा लिलाव बंद पाडत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान चांदवड (Bajar Samiti) बाजार समितीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. तर दुसरीकडे शेतकरी रस्त्यावर उतरत सरकारचा निषेध करत कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी केली आहे. या दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच येवला - नांदगाव रस्त्यावरील बाजार समिती समोर शेतकऱ्यांनी रास्ता रोखला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT