Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : पैशाच्या गैरवापर करून निवडून आले, आता निवडून यायची त्यांना खात्री नाही; संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

Nashik Malegaon News : शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज दुपारी मालेगाव येथे गेले असताना माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मालेगाव  (नाशिक) : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहे. मात्र गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून प्रशासक राज म्हणजे भ्रष्टाचाराला सूट देणे होते. यांनी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणू शकले नाही. विधानसभेत लबाडी आणि पैशाच्या गैरवापर करून निवडून आले आहेत. आता निवडून यायची त्यांना खात्री नाही; अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज दुपारी मालेगाव येथे गेले असताना माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर मालेगावच्या महापालिका निवडणुकीत काय करायचे आहे, त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. मालेगावा मनपा निवडणूक जात, धर्म, गट, पैसा यांना सामोरे जाऊन निवडणूक लढवायची असून निवडणूकसाठी कोर कमिटी तयार करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. आता महाराष्ट्रात एकच विरोधी पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

धुळे रोकड प्रकरणाची एसआयटी कमिटी कुठे गेली?  
धुळे शासकीय विश्राम गृहात घोटाळा शोधणारी समिती येते. त्या समितीच्या प्रमुखाला नजराणा देण्यासाठी ही रक्कम कुणी आणली. त्यातील एक मोठी रक्कम मोठ्या व्यक्तीला दिली गेली. १० कोटी जालन्यात स्वीकारण्यात आले. या संबंधी देवेंद्र फडणवीसांनी चौकशी केली पाहिजे.देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे नाव बदलून देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असे ठेवावे. त्यांनी स्थापन केलेली SIT कमिटी कुठे आहे; असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

देशातील भ्रष्ट्राचार मोदींच्या आशीर्वादाने 
स्वतः पंतप्रधान वरच घोटाळ्यांचे आरोप आहेत. देशातील सुरू असलेला भ्रष्टाचार हा नरेंद्र मोदींच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकणार नाही. त्यांच्या पाठिंबाने सर्व घोटाळे सुरू आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी दाऊद यांच्यासोबत संबंध असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले होते. त्यांच्यासाठी रेड कार्पेट त्यांनी टाकले. ७५ हजार कोटींचा अजित पवारांनी घोटाळा केला, तेच आता त्यांच्या बरोबर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT