nashik news  saam tv
महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये कुंभमेळा कधी? शाहीस्नानाच्या तारखा आल्या समोर, वाचा सविस्तर

Full schedule of Nashik Kumbh Mela including royal bath dates: नाशिकचा कुंभमेळा 2027 साली होणार असून याबाबतच्या सर्व तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत

Omkar Sonawane

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये सर्व साधू महंतांसोबत कुंभमेळ्याची बैठक घेतली. यामध्ये 13 आखड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयीची बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. सर्व प्रमुख साधू महंत या बैठकीला उपस्थित होते.

या आहे शाही स्नानाच्या प्रमुख तारखा

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुंभमेळ्याची बैठक पार पडली. आज बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय हे चकाचक करण्यात आले होते. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि नरहरी झिरवळ हे उपस्थित होते.

तसेच 10 शैव अखाड्याचे 20 महंत तर 3 वैष्णव आखड्याचे 6 महंत उपस्थित होते. 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण होणार असून दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. आणि साधूग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा धजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळापर्व सुरू राहणार आहे.

कुंभमेळा नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत कुंभमेळामध्ये होणाऱ्या तारखा जाहीर

पहिले अमृतस्नान- 31-08-2027

दुसरे अमृतस्नान- 31-08-2027

तिसरे अमृतस्नान- 12-09-2027

नाशिक कुंभमेळा अमृतस्नान

पहिले अमृतस्नान 2-08-2027

दुसरे अमृतस्नान- 31-08-2027

तिसरे अमृतस्नान- 11-09-2027

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birthday Gift for Girlfriend: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला द्या सरप्राईज गिफ्ट; 'ती' होईल खुपच खूश

Palghar : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा, पालघरमध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण भोवलं

Liquor Tragedy : धक्कादायक बातमी! विषारी दारूमुळे मोठा अनर्थ; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेवर मंगळवारी १२ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या वेळेत बदल

High Blood Pressure Diet Tips: तुम्हालाही हाय बीपीचा त्रास आहे? मग काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT