NASHIK KASHYAPI DAM TRAGEDY: FAMILY OF FOUR DIES IN DROWNING INCIDENT Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये काळजाचा थरकाप; गरोदर महिलेसह चौघांचा बुडून मृत्यू, २ वर्षांची चिमुकली सुरक्षित

Nashik Kashyapi Dam Drowning Incident : नाशिकमधील कश्यपी धरण परिसरात सुट्टीसाठी गेलेल्या कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या कश्यपी धरणावर चार जणांचा बुडून मृत्यू

  • मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश

  • मृत महिला गरोदर असल्याची माहिती

  • स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य, मात्र जीव वाचवण्यात अपयश

  • एका महिलेने २ वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला

अभिजीत सोनावणे, नाशिक

Nashik Kashyapi Dam Drowning Incident Family Drown नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण परिसरात सुट्टीचा आनंद घ्यायला गेलेल्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली आणि चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नाशिकमधून काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत धरणावर आनंद लुटण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण परिसरात एका कुटुंबाचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे मृत स्त्री गरोदर असल्याची माहिती आहे. या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ठोंबरे, रोहिणी ठोंबरे अशी मृत पती पत्नींची नावे असून दोन मुले ही ठोंबरे कुटुंबियांच्या शेजारी राहणारी होती. हे चौघेही मखमलाबाद नाका येथील रहिवाशी होते ठोंबरे कुटुंब सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी कश्यपी धरण परिसरात गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आजूबाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली जास्त असल्यामुळे सुरुवातीला त्यांना यश आले नाही. दरम्यान, परिसरात उपस्थित असलेल्या एका धाडसी महिलेने ठोंबरे दाम्पत्याची अवघी २ वर्षांची मुलगी पाण्याकडे जात असल्याचे तिच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता तिने त्या मुलीला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि तिचा जीव वाचवला.

घटनेनंतर स्थानिक तरुणांनी तत्परता दाखवत खोल पाण्यात उड्या घेत शोधकार्य सुरू केले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पर्यटकांनी पाण्याजवळ जाताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, धरण परिसरात सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात प्रायव्हेट पार्ट्समध्ये फंगल इन्फेक्शन का होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Suryakumar Yadav : माझ्या नावानं खोटं..., व्हायरल पोस्टवर सूर्यकुमार यादवची सणसणीत चपराक, सूर्यवंशीसाठी खास मेसेज

French President Macron: मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष असलेल्या हॉटेलजवळ स्फोट; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदारांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह

Monsoon Foot Care: पावसाळ्यात चप्पल लागून पायावर फोड येतात? हे ७ सोपे उपाय करतील इन्फेक्शन आणि दुर्गंधी दूर

SCROLL FOR NEXT