Nashik Factory Fire
Nashik Factory Fire  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: जिंदाल कंपनीत बॉयलरमध्ये स्फोटानंतर भीषण आग; दोन जखमी महिला कामगारांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

साम टिव्ही ब्युरो

Nashik Fire Update : नाशिकमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली आहे. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींवर नाशिकच्या सुयश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीत १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या १४ जखमी कामगारांपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या जखमी कामगारांना नाशिकच्या सुयश आणि एसएमबीटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच नाशिकच्या आयसीयू ट्रॉमा सेंटर रुग्णालयामध्ये चार जखमी रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला आहे

जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत मृत झालेल्या दोन महिला कर्मचारी होत्या. महिमा आणि अंजली असे दोघांची नावे आहे. महिमा यांचे वय २० होते तर अंजली यांचे वय २७ असून दोघांचाही या आगीत मृत्यू झाला आहे. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर नाशिक जिंदाल कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे या गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. कंपनीत स्पोट झाला तेव्हा त्याची भीषणता इतकी होती की, आसपासच्या २० ते २५ गावांना मोठा आवाज ऐकू आला. कंपनीत साधारणता २००० कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आता पर्यंत ९ ते १० जखमींना सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींना चांगले उपचार मिळावेत - अजित पवार

दरम्यान, अजित पवार यांनी देखील जिंदाल आगीवर भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, 'नशिक जिल्ह्याच्या इगतपुरीतील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीच्या प्लांटला आग लागल्याची घटना भीषण आहे. प्लांटमध्ये अडकलेल्या कामगारांची सुखरुप सुटका व्हावी. जखमी कामगारांना त्वरित, चांगले उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत. आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन, पोलिस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यश मिळो, अशी प्रार्थना करतो'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Health Tips : तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर, ICMR च्या अभ्यासातून नवीन माहिती उघड

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

SCROLL FOR NEXT