Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांनी थेट रुग्णालय फोडलं, नाशिकमधील धक्कादायक घटना

याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असताना पुन्हा डिपाॅझिटचे पैसे मागणाऱ्या परिचारिका व अकाउंटंटला मृताच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना सुविचार हाॅस्पिलटमध्ये घडली आहे. मृताच्या तीन नातेवाईकांनी राडा घालत रुग्णालयातील काचांवर दगडफेक केली. तसेच परिचारिकेला व अकाउंटंटला मारहाण करुन अॅम्बुलन्सच्या काचा फाेडल्या. याबाबत मुंबई नाका पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

गुरुवारी पहाटेच्या सुमारास टाकळी येथील विक्रम नथू गांगुर्डे यांची प्रक्रृती खालावल्याने त्यांना नातेवाईकांनी सुविचार रुग्णालयात (Hospital) दाखल केले. त्यांचा सीटीस्कॅन करण्यात आल्यावर मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याचे डाॅक्टरांच्या लक्षात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना या गोष्टीची कल्पना दिली. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी रुग्णाचा मृत्यू झाला.

यावेळी रुग्णालय प्रशासन व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. परंतु, रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना डिपॉजिटची मागणी करण्यात आली होती याचा राग मनात धरून मृत विक्रम नथू गांगुर्डे यांचा भाऊ प्रशांत गांगुर्डे यांनी त्याच्या साथीदारांसह शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास रुग्णालयात येत डिपॉजिट मागणाऱ्या कर्मचाऱ्याला व परिचारिकेला मारहाण केली. त्याचप्रमाणे दगडफेक करून रुग्णालयाच्या व रुग्णवाहिकेच्या काचा फोडून नूकसान केले. या प्रकरणी डॉ. अविनाश आंधळे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी शरद पवार यांची बैठक होण्याची शक्यता

Junnar Crime : शेतमालाची चोरी करण्यास विरोध; बाजार समितीत तरुणांकडून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

RCB Captain: RCB चा कॅप्टन ठरला! डू प्लेसिसनंतर या खेळाडूला मिळणार जबाबदारी

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

SCROLL FOR NEXT