Nashik Helmet Drive  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Helmet Drive: नाशकात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी, पहिल्यांदा 500 रुपये दंड, दुसऱ्यांदा थेट लायसन्स रद्द

आजपासून नाशिक शहरात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून नाशिक शहरात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आजपासून नाशकात विना हेल्मेट दुचाकी चालकाला प्रथम 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल. तर दुसऱ्यावेळी थेट लायसन्स रद्द होणार आहे (Nashik Helmet Drive Rs 500 Fine To Without Helmet Two Wheeler Riders).

गेल्या 15 ऑगस्टपासून नाशिक (Nashik) शहरात हेल्मेटसक्तीची मोहीम (Helmet Drive) सुरु आहे. पहिल्या टप्प्यात नो हेल्मेट, नो पेट्रोल (No Helmet No Petrol), दुसऱ्या टप्प्यात विनाहेल्मेट दुचाकी (Bike) चालकांचं समुपदेशन आणि परीक्षा, तर तिसऱ्या टप्प्यात नो हेल्मेट, नो एन्ट्री मोहिमेनंतर आता थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

आजपासून हेल्मेट (Helmet) सक्तीच्या दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. पहिल्या वेळी नियम मोडल्यास 500 रुपये दंड, तर दुसऱ्यावेळी 1 हजार रुपये दंडासह 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT