विना हेल्मेट भरधाव वेगात नवरीच्या शोधात निघाला, पोलिसांकडून थेट 14 हजारांचं चालान

कानपूरमधील एक तरुण विना हेल्मेट रस्त्यावर वेगाने बाईक चालवतानाचा व्हिडीओ पुढे आला आहे. इतकंच नाही तर हा तरुण रस्त्यावर गाणे म्हणत नाचत गाडी चालवत हिरोगिरी करताना दिसतोय.
विना हेल्मेट भरधाव वेगात नवरीच्या शोधात निघाला
विना हेल्मेट भरधाव वेगात नवरीच्या शोधात निघालाSaam Tv
Published On

लखनौ : उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातील अनेक मजेशीर व्हिडीओ सोशम मीडियावर व्हायरल होत असतात (Viral Video On Social Media). काहीच दिवसांपूर्वी एक व्यक्ती गुटखा खाऊन फोनवर बोलतानाचा फनी व्हिडीओ (Funny Video) व्हायरल झाला होता. आता कानपूरमधील एक तरुण विना हेल्मेट रस्त्यावर वेगाने बाईक चालवतानाचा व्हिडीओ पुढे आला आहे. इतकंच नाही तर हा तरुण रस्त्यावर गाणे म्हणत नाचत गाडी चालवत फुल्ल हिरोगिरी करताना दिसतोय. पण, पोलिसांनी (Uttar Pradesh Police) जेव्हा या हिरोची हिरोगिरी पाहिली तेव्हा त्यांनी या तरुणाला असा धडा शिकवला की तो पुन्हा कधीही असं काही करण्याचा विचारही करणार नाही - Viral Video Kanpur Man Riding Bike Without Helmet Goes Viral On Social Media UP Police Finned Him 14000 rs

उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police Twitter Account) स्वत: सोशल मीडिया अकाउंटवर या तरुणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पोलिसांनी सांगितलं आहे की ही व्यक्ती विनाहेल्मेट वेगाने गाडी चालवतोय. त्यामुळे त्याला याचा मोठा दंड भरावा लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

विना हेल्मेट भरधाव वेगात नवरीच्या शोधात निघाला
औरंगाबाद : बहिणीने भावाला पोलीस ठाण्यासमोरच दिला चोप, कारण ऐकून थक्क व्हाल!

गोविंदाच्या गाण्यावर बाईक वाला डान्स

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण फिल्मी स्टाईलमध्ये बुलेटवर बसून त्याचा व्हिडीओ बनवत आहे. गजबजलेल्या रस्त्यावर याने ना हेल्मेट घातले होते, ना वाहतूक नियमांची कुठलीही पर्वा त्याला होती. हा व्हिडीओ एका म्युझिकल अॅपमध्ये बनवण्यात आला असून तो 'मुझे एक ऐसी ही फाई लुगाई चाहिये' या गोविंदाच्या गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहेत. बुलेटवर बसून तो बेफिकीरपणे स्टंटही करतोय. त्यानंतर युपी पोलिसांनी त्याच्यासोबत जे केले ते अधिक मनोरंजक आहे.

पाहा व्हिडीओ -

पोलिसांनी थेट 14,000 रुपयांचे चालान कापले

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव खालिद अहमद असून त्याचा व्हिडीओ युपी पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर कानपूर ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला थेट 14 हजार रुपयांचे चालान पाठवले आहे. या व्हिडीओच्या अखेरीस खालिद स्वत: 14000 चे चालान करण्यात आले असून त्याने ते भरले असल्याचे सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ 6-7 महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता तो पुन्हा व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करताना युपी पोलिसांनी लिहिले की, "फक्त व्हायरल होण्यासाठी आणि लाईक्ससाठी गाडी चालवताना रिस्क घेऊ नका, कारण तुमची कहाणी कायमची संपुष्टात येऊ शकते".

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com