औरंगाबाद : बहिणीने भावाला पोलीस ठाण्यासमोरच दिला चोप, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्या मुलीला मामाकडे जाण्यास मज्जाव करताना वाद झाल्यानं आईने आपल्या मुलीसह भावाला बेदम चोपल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.
औरंगाबाद : बहिणीने भावाला पोलीस ठाण्यासमोरच दिला चोप, कारण ऐकून थक्क व्हाल!
औरंगाबाद : बहिणीने भावाला पोलीस ठाण्यासमोरच दिला चोप, कारण ऐकून थक्क व्हाल! SaamTvnews

औरंगाबाद : आपल्या मुलीला मामाकडे जाण्यास मज्जाव करताना वाद झाल्यानं आईने आपल्या मुलीसह भावाला बेदम चोपल्याची (Beating) घटना औरंगाबाद (Aurangabad) मधील एमआयडीसी वाळूज पोलीस (Police) ठाण्यासमोरच घडली आहे. दहावीत शिकणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या काही महिन्यांपूर्वी बजाजनगर येथे आई रामकौर विलास जाधवकडे राहत होती.

हे देखील पहा :

मात्र, आईची वागणूक पसंत नसल्याने मुलगी मामाच्या गावी म्हणजे बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील बेलगाव येथे गेली होती. ती मुलगी आपल्या मामाकडे राहून पुढील शिक्षण घेणार होती. त्यासाठी ती टीसी घेण्यासाठी औरंगाबाद शहराजवळील बजाजनगरात आली होती. मात्र, तीला टीसी न देता, तु मामाकडे जाऊ नको. येथेच राहून शिक्षण घे, असा आग्रह आईने धरला. आई रामकौर जाधव हि तिच्या मुलीला आणि स्वतःच्या भावाला याबाबद्दल सांगत असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यात ती मुलगी मामाकडे जाण्यावर ठाम होती.

औरंगाबाद : बहिणीने भावाला पोलीस ठाण्यासमोरच दिला चोप, कारण ऐकून थक्क व्हाल!
Kalyan : कोळसेवाडी पोलिसांच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला!
औरंगाबाद : बहिणीने भावाला पोलीस ठाण्यासमोरच दिला चोप, कारण ऐकून थक्क व्हाल!
विकत घेता की फुकट खाता? भाजीपाला विक्रेत्याचा फलकाच्या माध्यमातून उपहासात्मक संदेश!

या वादात मुलीसह आई रामकौर जाधव व मामा नकुस टोणगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ते पोलीस ठाण्यात आल्यांनतर ही त्यांच्यातील वाद सुरूच होता. हा वाद विकोपाला गेल्याने रामकौर हीने अल्पवयीन मुलीसह भाऊ नकुस टोणगे याला चप्पलेने बेदम चोपले. मात्र, चक्क पोलीस ठाण्यासमोर झालेल्या या फ्रि स्टाईल मुळे पोलीसांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, पोलीसांनी हस्तक्षेप करून सर्वांना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com