Chhagan Bhujbal challenges Girish Mahajan over Nashik Guardian Minister post as Kumbh Mela 2027 preparations spark Mahayuti clash Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन कुंभ,भुजबळांची पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग

Kumbh Mela 2027 Triggered Mahayuti: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वादाचा नवा अंक सुरु झालाय.. तर भुजबळांनी भाजपवर कुरघोडी केलीय.. ती नेमकी कशी? आणि कुंभ मेळ्यावरुन महायुतीत कसा आखाडा रंगलाय?

Omkar Sonawane

रायगडनंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा आखाडा रंगलाय... गिरीश महाजन आणि दादा भुसेनंतर छगन भुजबळांनी पालकमंत्रिपदासाठी दंड थोपटलेत.. नाशिकचा मंत्री म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक घेण्याचा अधिकार असल्याचं सांगत भुजबळांनी उघडपणे गिरीश महाजनांना आव्हान दिलंय..

त्यानंतर अजित पवारांनीही भुजबळांच्या अनुभवाचा दाखला देत कुंभमेळ्याच्या बैठका घेण्याचं समर्थन केलंय...नाशिकमध्ये 15 आमदार आहेत.. त्यापैकी 7 आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे, 2 आमदार शिंदे सेनेचे तर 5 आमदार भाजपचे आहेत.. त्यामुळे भुजबळांनी पालकमंत्रिपदावर दावा केलाय.. मात्र शिंदे सेनेने मात्र भुजबळांच्या पालकमंत्रिपदाला उघड विरोध केलाय...

खरंतर नाशिकला 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देखरेखीखाली पुर्वतयारीला सहा महिन्यांपासून सुरुवात झालीय...आणि नाशिकमध्ये पालकमंत्री नसतानाही कुंभमेळ्याचे अधिकार गिरीश महाजनांकडे देण्यात आलेत..

एवढंच नाही तर कुंभमेळ्यासाठी तब्बल 24 हजार कोटींची मागणी कऱण्यात आलीय..त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 2 हजार 270 कोटी याबरोबरच 1400 कोटी रुपयांच्या 3 योजना मंजूर केल्या आहेत...एवढंच नव्हे तर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणासाठी 1 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.

मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्यानं कुंभावरुन आखाडा रंगलाय.. एकीकडे महाजनांनी महायुतीच्या मंत्र्यांना टाळून बैठका घेतल्या.. तर दुसरीकडे भुजबळांनीही स्वतंत्ररित्या आढावा घेतलाय.. आता शिंदेही नगरविकास विभागाच्या आडून डाव टाकण्याच्या तयारीत आहेत... त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्रिपदावरुन नाशिकचा आखाडा रंगण्यासोबत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : थंड हवा, धबधबे, हिरवीगार वनराई; भारतातील 'या' हिल स्टेशनची बातच न्यारी

Tuesday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, सासरवाडीकडून धनयोगाचा लाभ दिसतोय; ५ राशींच्या लोकांना सुख समृद्धी मिळणार

Dry Potato Bhaji: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा स्वादिष्ट आणि चविष्ट बटाट्याची सुकी भाजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नाशिक मुंबई महामार्गावर रायगडनगर जवळ खाजगी बसला भीषण अपघात

Dhananjay Munde: 'ते विधान मागे घ्या' बंजारा समाज भर सभेत धनंजय मुंडेंवर भडकले|VIDEO

SCROLL FOR NEXT