Shubhangi Patil Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सत्यजीत तांबेंना थेट आव्हान देणाऱ्या शुभांगी पाटील कोण आहेत? ठाकरेंच्या पाठिंब्यानं मैदान मारणार का?

Mahavikas Aghadi चा पाठिंबा मिळताच शुभांगी पाटील यांनी राजा का बेटा राजा नही बनेगा, अशी गर्जना करत थेट भाजपाला आव्हान दिले आहे.

Gangappa Pujari

Nashik: नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीत एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसकडून एबी फॉर्म देऊनही सतिश तांबे यांनी फॉर्म भरला नव्हता. त्यामुळेच ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरत मोठा ट्विस्ट निर्माण केला होता.

मात्र आता काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये असलेल्या शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर आता महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. भाजपाशी फारकत घेत मातोश्रीवर आलेल्या शुभांगी पाटील कोण आहेत, चला जाणून घेवू. (Nashik News)

महाविकास आघाडीकडून पाठिंबा देण्यात आलेल्या शुभांगी पाटील या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर शुभांगी पाटील महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.

यासोबतच त्या महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या त्या प्रमुख सल्लागार आहेत. याशिवा शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

शुभांगी पाटील काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये होत्या. मात्र भाजपाचा सत्यजित तांबे यांना पाठिंंबा मिळण्याची चर्चा होताच त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांना पाठींबा जाहीर करण्यात आला.

दरम्यान, महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांचे पारडे जड वाटत आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांना ही निवडणुक जड जाणार असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या हातात लाल संविधान आलं कुठून? फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नाशिक एसीबीचा दणका; ५०० रुपये घेताना भूमिअभिलेख उपअधीक्षकाला पकडलं

५, ६ की ७? दिवाळीत संध्याकाळी किती वाजता दिवे लावावे? जाणून घ्या योग्य वेळ

मुंबईत अनधिकृत बांधकामांचा महापूर! १० वर्षांत २.१४ लाख तक्रारी, महापालिकेची कारवाई किती?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, श्री बालाजी लाडू सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

SCROLL FOR NEXT