Jitendra Awhad alleges Ashok Kharat’s link to a 2007 journalist murder, intensifying the controversy around the fake godman. 
महाराष्ट्र

Ashok Kharat: अशोक खरातचं पहिलं कांड; २००७मध्ये पत्रकाराला संपवलं; जितेंद्र आव्हाडांनी उघडकीस आणलं भोंदू बाबानं घडवलेलं हत्याकांड

Jitendra Awhad on Ashok Kharat: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला आहे की, अशोक खरातचा पहिला मोठा गुन्हा २००७ सालचा आहे. खरातने एका पत्रकाराची हत्या घडवली होती. या खुलाशाने सुरू असलेल्या प्रकरणाला एक नवीन वळण दिले आहे.

Bharat Jadhav

  • जितेंद्र आव्हाड यांचा 2007 मधील खुनाचा धक्कादायक आरोप

  • पत्रकार बाळू तूपे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत

  • अशोक खरातच्या गुन्हेगारी इतिहासावर नवे प्रश्न

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. खरात प्रकरणात दररोज नवीन खुलासे बाहेर येत आहेत. पूजा,विधीच्या नावाने खरात त्यांचे लैंगिक शोषण करत होता. खरात प्रकरणावरून सरकारला जाब विचारताना जिंतेंद्र आव्हाड यांनी पोलीस यंत्रणेवर सवाल उपस्थित केले आहेत.

खरात या भोंदू बाबाचा पहिला कांड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता उघडकीस आणला आहे. खरातनं २००७ मध्ये पहिला खून पत्रकार बाळू तूपेचा केला होता,असा धक्कादायक खुलासा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.यामुळे जुन्या प्रकरणाला नव्याने उजाळा मिळाला आहे.

याप्रकरणी बोलताना आव्हाड म्हणाले , नाशिकमध्ये शांतपणे याची चर्चा सुरु होती, तेव्हा कोणीही गांभीर्याने याची दखल घेतली नाही. सकाळ वृत्तसंस्थेसह अनेक वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत १० लेख लिहून आले होते.त्यामुळे अशोक खरात पोलिसांना माहित नव्हता असं नाही. दरम्यान पोलीस चांगला तपास करत आहेत, पण याप्रकरणात गुप्तचर यंत्रणां अपयश ठरली आहे, असंही आव्हाड म्हणालेत.पोलिसांनी ही माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना द्यायला हवी होती की नाही?

आरोपींना वाचण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे फक्त फडणवीसांना माहिती असलेल्या चांगल्या, मोठ्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले. तिथे जाऊन लोटांगण घालत होते.अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचाही काहीजण प्रयत्न करत होते. अशोक खरात यांच्याकडे पूजा घाला म्हणून गेले होते.वेळ येईल तेव्हा नाव उघड करु. ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांपूर्वी मिळाली होती," असाही दावा त्यांनी केला आहे.

भोंदू बाबाचा दहावीचा रिझल्ट आला समोर

स्वतःला 'अंकशास्त्र' तज्ज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन'प्रत्यक्षात शालेय जीवनात गणितात नापास होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. एसआयटीच्या तपासात अशोक खरातच्या भूतकाळातील अनेक पाने उलगडली जात आहेत. शाळेच्या रेकॉर्डनुसार अशोक खरातचे नाव लक्ष्मण खरात असे होते.पुढे त्याने आपले नाव बदलून अशोक खरात केले.तो सिन्नर तालुक्यातील वावी येथील एका माध्यमिक शाळेचा विद्यार्थी होता. खरातला दहावीच्या परीक्षेत एकूण 700 पैकी केवळ 251 गुण मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Eye Care Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

मोठी बातमी! फरार सत्ताधारी आमदाराच्या आवळल्या मुसक्या; अत्याचार प्रकरणी पोलिसांची थेट दुसऱ्या राज्यात घुसून कारवाई

Kharat Case : मुख्यमंत्री फडणवीसांची खुर्ची घालवण्यासाठी अघोरी पूजा; ३८ आमदारांनी खरातकडे बोट कापलं, महाराष्ट्राला हादरवणारे दावे

कुठे पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग, कुठे सरकारी कार्यालये बंद! आखाती युद्धामुळे जगात लॉकडाऊनची स्थिती

Pediatric Kidney Cancer: 2 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये वाढतोय धोका, लहानग्यांमध्ये दिसणाऱ्या किडनी कॅन्सरची लक्षणं वेळेत ओळखा

SCROLL FOR NEXT