A shocking conversion and blackmail case in Nashik raises concerns over a possible larger racket targeting young women. saam tv
महाराष्ट्र

नाशिकमध्ये आता धर्मांतराचं 'गजवा-ए-हिंद' ब्लॅकमेलिंगचा 'लव्ह बाईट' पॅटर्न

Nashik Conversion Case: नाशिकमधील धर्मांतराची प्रकरण काही थांबण्याचं नाव नाही... अशातच धर्मांतरासाठी आरोपींनी गजवा-ए- हिंदचा नवा पॅटर्न वापरलाय... नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय? TCS नंतर धर्मांतराचं हे दुसरं प्रकरण नेमकं कुठे घ़डलंय...?

Suprim Maskar

कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये नेमकं काय चाललयं... कारण धर्मांतराच्या प्रकरणांनी नाशिकमध्ये उच्छाद मांडलाय. एकीकडे नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण ताजं असतानाच, आता पंचवटी भागात एका तरुणीला 'गजवा-ए-हिंद'चे धडे देत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय..

आता धर्मांतराचं 'गजवा-ए-हिंद'

नाशिकमधील तरुणीला बळजबरीनं दारू आणि सिगरेट पाजून .संशयित आरोपी तंजीर इनामदारने तिच्यावर अत्याचार केले..इतकेच नव्हे तर तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत तिच्या धार्मिक भावना दुखावल्या...आरोपीनं तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरीने तोडून टाकला. तसचं आरोपीने तिला एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे 'गजवा-ए-हिंद'चे पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी प्रचंड दबाव टाकला.

तसचं जानेवारी महिन्यात आरोपीनं पीडितिचेच्या मानेवर चावा घेऊन लव्ह बाईट असल्याचे सांगत पीडितेसोबत आक्षेपार्ह फोटो काढले... हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊनच आरोपीनं अत्याचार केल्याचं पीडितेनं सांगितलयं...

दरम्यान पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी तंजीर इनामदारला ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आले...त्यावेळी सरकारी वकील आणि आरोपींच्या वकीलांमध्ये काय युक्तीवाद झालाय...

कोर्टात काय घडलं?

सरकारी वकील

जानेवारीत आरोपीनं पीडितेवर अत्याचार केला

आरोपी वकील

जानेवारीत अत्याचार झाला मग तेव्हापासून आतापर्यंत वेळ का घालवला?

सरकारी वकील

आरोपीनं धर्मांतरणासाठी पीडितेवर जबरदस्ती केली

आरोपीचा वकील

प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे हा आरोप होतोय

सरकारी वकील

आरोपीला पोलीस कोठडी द्या

आरोपीचा वकील

पोलीस कोठडीची कोणतीही गरज नाही

न्यायालयानं आरोपी तंजीर इनामदारला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. दुसरीकडे नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा तपास SIT कडे देण्यात आलाय. मात्र TCS धर्मांतर प्रकरणात आरोपीनं

व्हॉट्सॲप ग्रुपमधून धर्मांतराचा कट रचल्याचंही समोर आलयं... यात आरोपींचा मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंगनंतर चॅटिंगमध्ये संशयास्पद संवाद समोर आलेत...ज्यामुळे TCS प्रकरणातील डिजिटल पुरावे आता संपूर्ण प्रकरणाचे सत्य उघडणार आहेत... मात्र या दोन्ही प्रकरणामुळे नाशिकमध्ये धर्मांतरचं रॅकेट सक्रीय आहे का? ब्लँकमेलिंग करून तरुणींना प्रेमाच्या नावाखाली जाळ्यात ओढण्याचा कुटील डाव आखणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे? हे शोधणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT