nashik fire news  Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Fire: नाशिकच्या मालेगावात भीषण आग; 25 हून अधिक घरे जळून खाक, गरिबांच्या संसाराची झाली राखरांगोळी

nashik malegon house fire news: नाशिकच्या मालेगाव शहरातून आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात लागलेल्या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अजय सोनवणे, मालेगाव

Nashik Malegaon Fire News:

नाशिकच्या मालेगाव शहरातून आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात लागलेल्या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी संध्यकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात एका घराला आग लागल्याची घटना घडली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास २५ पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत.

आग नेमकी कशी लागली?

छोटी वस्ती आणि लाकडांची घरे असल्याने एका घराला लागलेली आग काही सेकंदात सर्वत्र पसरली. अवघ्या काही मिनिटात आग सर्वदूर पसरली. मालेगाव महापालिकेच्या आग्निशामक पथकाच्या जवांनानी ११ फेऱ्या मारत आग आटोक्यात आणली. यात अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असले आहेत. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.

हैदराबादमध्ये आगीची घटना

हैदराबादमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास अंकुरा रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे इमारतीत अनेक रुग्ण अडकले. ही आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इमारतीच्या पाचव्या मजल्याला आग लागल्यानंतर ही आग दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

SCROLL FOR NEXT