चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यामागील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईचे धागेदोरे नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचल्यानंतर चंद्रपूर पथकाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका शेतातील शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट विदेशी मद्य निर्मिती आणि बॉटलिंग कारखान्यावर छापा टाकला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारची आंतरजिल्हा कारवाई पहिल्यांदाच चंद्रपूरने केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने नंदोरी टोल नाक्यावर एका बोलेरो पिकअप आणि टाटा हॅरियर वाहनातून अवैध विदेशी मद्याची वाहतूक पकडली. यामध्ये गोवा बनावटीच्या नामांकित ब्रँडच्या १८० मिलीच्या ७१ बॉक्समधील ३,४०८ बाटल्या तसेच २ लिटरच्या १७ बॉक्समधील १०२ बाटल्या, असा एकूण ८८ बॉक्स मद्यसाठा जप्त करण्यात आला. मद्यसाठ्याची किंमत अंदाजे ११ लाख ३८ हजार रुपये असून दोन्ही वाहनांची किंमत अंदाजे २७ लाख रुपये आहे.
अशा प्रकारे एकूण ३८ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टाटा हॅरियर वाहनचालक बादल महादेव विरुटकर (वय २६ वर्षे) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. अटक केलेल्या आरोपीकडून सदर मद्यसाठा नाशिक जिल्ह्यातून आणल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चंद्रपूर पथकाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका शेतातील शेडमध्ये छापा टाकला. या ठिकाणी बनावट विदेशी मद्य तयार करून त्याचे बॉटलिंग व पॅकिंग करण्याचा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले. या कारवाईदरम्यान बॉटलिंग कारखान्याच्या ठिकाणावरून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.