नाशिकमध्ये कन्सल्टंट अटकेत
महिलांचे शोषण आणि फसवणुकीचे आरोप
कार्यालयातून संशयास्पद वस्तू जप्त
८ महिला पीडितांची ओळख पटली
अभिजीत सोनावणे, नाशिक
Nashik Ravindra Erande Physically Assault Abused Womens नाशिकमधील भोंदू अशोक खरातप्रमाणे प्रतिष्ठेचा मुखवटा घालून वावरणाऱ्या कन्सल्टंट रवींद्र नारायण एरंडे याचा पाय दिवसेंदिवस खोलात अडकत चालला आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या एरंडेच्या पोलीस कोठडीत नाशिक सत्र न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासादरम्यान एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. या वस्तू सापडल्याने आता भोंदूगिरीचा संशय व्यक्त केला जात आहे.
रवींद्र एरंडे हा सातपूर भागातील स्वघोषित पत्रकार आणि समाजसेवक आहे. राजकारणातील दिग्गज नेत्यांसोबत त्याचा वावर आणि मोठं मोठे सन्मान यामुळे त्याची समाजात एक चांगली प्रतिमा होती. मात्र, आता त्याच्या या सोज्वळ चेहऱ्यामागचे काळे वास्तव समोर आल्याने सातपूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
भोंदू खरातप्रमाणेच एरंडेने देखील महिलांना विविध आमिषे दाखवून भोंदूगिरी केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याच्या सातपूर येथील कार्यालयात झडती घेतली असता तिथे सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवडी यांसारख्या संशयास्पद वस्तू सापडल्या. या वस्तूंचा वापर तो महिलांना घाबरवण्यासाठी किंवा वश करण्यासाठी करत होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. याशिवाय त्याच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणातील तपासादरम्यान एरंडेच्या जाळ्यात अडकलेल्या ८ महिलांची ओळख पटली आहे. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर अनेक पीडितांनी पुढे येऊन माहिती दिली आहे. नोकरीचे आमिष दाखवून किंवा इतर फसवणुकीद्वारे त्याने या महिलांची पिळवणूक केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलीस सध्या अत्यंत गोपनीय पद्धतीने या महिलांचे प्रबोधन करत असून त्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.