Exhaust Fan Cleaning Tips : एक्झॉस्ट फॅन घरच्या घरी कसा कसा स्वच्छ कराल? लगेचच वाचा टिप्स

Sakshi Sunil Jadhav

स्वयंपाकघरातला फॅन

स्वयंपाकघरात किंवा बाथरुममध्ये बसवलेला एक्झॉस्ट फॅन घरातली दुर्गंधी, धूर आणि ओलावा बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं काम करतो. पण सततच्या वापरामुळे त्यावर धूळ, तेलकटपणा आणि घाण साचतो.

Exhaust Fan Cleaning Tips

वीजपुरवठा बंद करा

एक्झॉस्ट फॅन साफ करण्याआधी मेन स्विच बंद करा. सुरक्षिततेसाठी प्लग काढून ठेवणं जास्त फायदेशीर ठरेल.

Exhaust Fan Cleaning Tips

धूळ साफ करा

फॅनच्या बाहेरच्या भागावर साचलेली धूळ मऊ कापड किंवा ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने साफ करा.

Kitchen Exhaust Fan Cleaning

फॅनचे कव्हर काढा

काही फॅनचं कव्हर सहज काढता येतं. स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीनेते अलगद काढून वेगळे ठेवा.

Kitchen Exhaust Fan Cleaning

साबणाच्या पाण्यात कव्हर धुवा

कव्हरवर तेलकट थर असेल तर कोमट पाण्यात डिटर्जंट मिक्स करून ते धुवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन पूर्णपणे वाळू द्या.

Kitchen Exhaust Fan Cleaning

व्हिनेगर वापरा

फॅनच्या ब्लेडवर चिकटलेली घाण काढण्यासाठी व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण फायदेशीर ठरतं. कापडाने ब्लेड हलक्या हाताने पुसा.

Kitchen Exhaust Fan Cleaning

मोटरवर थेट पाणी टाकू नका

फॅनची मोटर इलेक्ट्रिक भाग असल्यामुळे त्यावर थेट पाणी टाकणे टाळा. कोरड्या कपड्याने किंवा ब्रशनेच साफ करा.

Kitchen Exhaust Fan Cleaning

जुना टूथब्रश वापरा

कोपऱ्यातली धूळ आणि जाळीतली घाण काढण्यासाठी जुना टूथब्रश वापरा याने साफसफाई सोपी होते.

Kitchen Exhaust Fan Cleaning

पूर्णपणे वाळवा

धुतलेले कव्हर किंवा ब्लेड ओले असताना पुन्हा बसवू नका. सर्व भाग व्यवस्थित वाळल्यानंतरच फॅन सुरू करा.

Brush Cleaning | GOOGLE

NEXT: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

Matheran tourism | google
येथे क्लिक करा