Maharashtra earthquake today, 
महाराष्ट्र

Earthquake : नाशिक पुन्हा भूकंपाने हादरले, मध्यरात्री २ तालुक्यात जमीन थरथरली अन्...; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik earthquake : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण तालुक्यांत मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सलग दुसऱ्या दिवशी जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Namdeo Kumbhar

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Maharashtra earthquake today : मध्यरात्री एकापाठोपाठ बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांनी नाशिक जिल्हा पुन्हा एकदा थरारला आहे. काल सकाळी बसलेल्या धक्क्यानंतर मध्यरात्रीच्या शांततेत अचानक जमीन हादरली अन् गाढ झोपेत असलेले नागरिक भीतीपोटी रस्त्यावर धावले. सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.६ रेश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. दिंडोरी तालुक्यातील ननाशी, बागडीचा पाडा आणि पेठ तालुक्यातील शिवशेत परिसरात देखील मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के सलग बसणाऱ्या या हादऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तरीही प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सलग दोन दिवस जमीन थरथरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांत मध्यरात्री आणि पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील दळवट परिसरामध्ये मध्यरात्री ११:५६ वाजेच्या सुमारास धक्का बसला. तर सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, सराड आणि चिखली या भागांत मध्यरात्री ११:५५ ते पहाटे २:४५ वाजेच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले.

शनिवारी सकाळीसुद्धा बोरगाव परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा एकदा जमिनीला हादरे बसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन केंद्र आणि स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अजिबात न घाबरता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी यांनी माफी मागावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

Sunday Horoscope: नशीब चमकणार! या 3 राशींना मिळणार मोठी संधी; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : दुसरी स्त्री आवडूनही पुरुष तिच्याशी नात्याची कमिटमेंट का करत नाहीत? ‘ही’ 5 कारणं

Sunday Horoscope: मेष, सिंह, धनुसह या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT