Nashik Earthquake: 4.3 Magnitude Tremor, Aftershock Alert Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Eartquake : नाशिककरांनो काळजी घ्या! पुन्हा बसणार भूकंपाचा धक्का? प्रशासनाने दिला थेट 'हा' इशारा

Nashik Eartquake Alert Update News : नाशिक जिल्ह्यात ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप; पुन्हा धक्का जाणवण्याची शक्यता. प्रशासन सतर्क, प्रमुख धरणांची तपासणी पूर्ण आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन.

Alisha Khedekar

  • नाशिक जिल्ह्यात ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप

  • भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरात सीमेजवळील हातगड डोंगररांगांमधील भनवड परिसरात

  • राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून पुन्हा धक्का जाणवण्याची शक्यता वर्तवली

नाशिक जिल्हा काल रात्री १० वाजताच्या सुमारास भूकंपाने हादरला. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपानंतर आता पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून आणखी एका धक्क्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने नाशिक जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

काल रात्री जाणवलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरात सीमेवरील हातगड डोंगररांगांमधील भनवड परिसरात असल्याची नोंद करण्यात आली आहे. जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या धक्क्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यातील काही भागांत जाणवला.

भूकंपानंतर जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांची प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून पाहणी करण्यात आली. करंजवण, पालखेड, ओझरखेड, वाघाड, तिसगाव आणि पुणेगाव या सर्व धरणांची तपासणी पूर्ण झाली असून, सध्या कोणतीही हानी झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून करंजवण धरण २२ किलोमीटर, ओझरखेड ३४ किलोमीटर, तर वाघाड धरण ३५ किलोमीटर अंतरावर आहे.

पाटबंधारे विभागातील सर्व अभियंत्यांना धरणांवर पूर्णवेळ आणि बारकाईने निगराणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने मोकळ्या जागेत जावे आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी केवळ प्रशासनाकडून दिलेल्या अधिकृत माहितीकडेच विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्याच्या हत्येने खळबळ; ३ आरोपींना अटक करताच समोर आले धक्कादायक सत्य

Encounter: अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या, आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Maharashtra News Live Update: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

Wheat : १ महिना गव्हाचे पदार्थ खाणं बंद केलं तर काय घडेल? शरीरात होणारे 'हे' बदल पाहून थक्क व्हाल

महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; जवान हरिदास कापसे देशसेवा करताना शहीद

SCROLL FOR NEXT