Shinde Sena leaders submit proof of duplicate voter entries to election officials in Nashik. saam tv
महाराष्ट्र

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Duplicate Voters Found in Nashik : बोगस मतदारांवरून शिवसेना आक्रमक झालीय. नाशिक जिल्ह्यात ३ लाखांहून अधिक डुप्लिकेट आणि बोगस मतदारांची नोंदणी असल्याचा आरोप शिंदे सेनेने केलाय. पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडून तात्काळ कारवाईची मागणी केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • नाशिक पश्चिममध्ये 93 हजार 574 दुबार मतदारांची नोंदणी

  • देववळाली विधानसभेत 61 हजार 6 दुबार मतदारांची नोंदणी

  • मतदारयाद्यांमधील घोळावरून विरोधकांनी आयोगाला धारेवर धरलयं

राज्यात विरोधकांनी बोगस मतदारांवरून निवडणुक आयोगाविरोधात रानं उठवलयं..अशातच नाशिकमध्ये दुबार आणि बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा ऐरणीवर आलाय.सत्ताधारी शिंदेसेनेतील पदाधिकाऱ्यांनीच या बोगस मतदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. शिंदेंसेनेनं नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 3 लाख दुबार मतदारांची असल्याचा आरोप केलाय.

नाशिक जिल्ह्यात कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत. पाहूयात. देवळाली विधानसभेत 61 हजार 6 दुबार मतदारांची नोंदणी झालीय. तर नाशिक पूर्व विधानसभेत 86 हजार 239 दुबार मतदार तर नाशिक पश्चिममध्ये 93 हजार 574 दुबार मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप शिंदेसेनेनं केलाय. त्याशिवाय नाशिक मध्य विधानसभेत 58 हजार 34 दुबार मतदारांची नोंदणी झाल्याचा दावा शिंदेसेनेनं केलाय. नाशिकमध्ये दुबार मतदारांची नोंदणी होत असताना नाव सारखेच, फोटो आणि वय मात्र वेगळं असा धक्कादायक प्रकार घडलाय.

दुसरीकडे राज्यातील संपर्ण मतदारयाद्याच थेट रद्द करा अशी धक्कादायक मागणीचं महसूलमंत्री बावनकुळेंनी निवडणुक आयोगाकडे केलीय. आधीच मतदारयाद्यांमधील घोळावरून विरोधकांनी आयोगाला धारेवर धरलयं. त्यातच आता सत्ताधारी नेत्यांनीच मतदारयाद्यांमधील घोळ उघड केल्यामुळे आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT