Nashik earthquake tremors latest update  Saam TV marathi
महाराष्ट्र

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

Nashik earthquake tremors latest update : नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यातील विविध भागांना भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Namdeo Kumbhar

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Nashik earthquake today : नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी या तीन प्रमुख तालुक्यांमध्ये आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर तसेच पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ आणि हरणगाव भागामध्ये दुपारी १२:४० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर लगेचच, अवघ्या ५ मिनिटांनी म्हणजेच दुपारी १२:४५ मिनिटांनी दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि बागडीचा पाडा परिसरात जमिनीला हादरे बसले.

अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिक घराबाहेर पडले. नाशिकच्या या ग्रामीण आणि आदिवासी भागात सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे. वारंवार होणाऱ्या या भूकंपांमुळे प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मागील काही दिवसांत नाशिकमध्ये सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहे. मागील महिनाभरात नाशिकमध्ये ४ ते ५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

काँग्रेसने एकाचवेळी महाराष्ट्रासह ६ राज्याचे प्रभारी बदलले; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC पेपरफुटीवर राजकारण तापलं, राहुल गांधी म्हणतात, 'MPSCवर भाजपचा ताबा'

24 तासांत 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्ज आणि नापिकीचा विळखा

अपघाताचा थरार! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन् ३-४ वाहनांना धडाधड उडवलं

SCROLL FOR NEXT