अभिजित सोनावणे
नाशिक : कोरोनाच्या Corona पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान नाशिक जिल्हयाचे नियोजन हाताळणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे Suraj Mandhare यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह Positive आला आहे. Nashik District Collector infected by corona
राज्यात गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाने कहर केला आहे. असे असताना कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकार्यांवर Collector सोपविण्यात आली होती. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने नाशिक जिल्हयात तर अक्षरशः कहरच केला होता. नाशिक जिल्ह्याची सर्व जबाबदारी सांभाळली होती. आता दुसरी लाट ओसरत असतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हे देखील पहा-
पहिल्या लाटेत मालेगाव Malegaon शहर कोरोनाचे हॉटस्पॉट Hotspot झाले होते. प्रशासनाचा मालेगावमध्ये कोरोना व्यवस्थापन करतांना अक्षरशः कस लागला. तर दुसर्या लाटेत Second Wave नाशिक Nashik शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. या काळात जिल्हाधिकार्यांवरऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा, रूग्णालयातील बेड मॅनेजमेंट करतांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जबाबदारी टाकण्यात आली होती. ती यशस्वीपणे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पेलली.
या कोरोना काळातही प्रशासनातील अनेक अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. यावेळी जिल्हाधिकारयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. परंतु आता दुसरी लाट ओसरत आहे आणि तेव्हाच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. पुणे येथे जिल्हाधिकारी मागील तीन दिवस गेले होते. जिल्हाधिकारी दोन दिवसांपूर्वीच हे पुणे येथून परतले.
बैठकांना दोन दिवसांपासून उपस्थितीत :
जिल्हाधिकारी मांढरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांची भीती वाढली आहे. मांढरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध बैठकांना Meetings उपस्थिती लावली. गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तेथे त्यांची उपस्थिती होती. तर शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी कर्पोरेशन लिमिटेड Smart City Corporation Limited कंपनीच्या बैठकीलाही ते आलेले होते.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.