Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : धक्कादायक! 'भावपूर्ण श्रद्धांजली'चं स्टेट्‍स ठेवलं अन् आयुष्य संपवलं, नाशिकमध्ये एकाच कटुंबातील चौघांची आत्महत्या

Nashik Family Death Tragedy : नाशिक मधील देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथे युवकाने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ स्टेटस पाहून नातेवाईकांना घटना कळली. या घटनेचा पोलीस तपास सुरू.

Alisha Khedekar

  • तरुणाने स्वतः आत्महत्या करत कुटुंबाची देखील हत्या केली

  • व्हॉट्सऍप स्टेटसमुळे घटना समोर आली

  • घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक टीमची तपासणी सुरू

  • परिसरात भीती, हळहळ आणि तणावाचे वातावरण

अजय सोनावणे, नाशिक

ताणतणावाचे व्यवस्थापन, रागावर नियंत्रण, क्लेश, वैर, संताप, क्रोध ता बाबी अलीकडे अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत. चांदवड तालुक्यातील दिघवदची घटना ताजी असतानाच फुलेमाळवाडी (ता. देवळा) येथील गोविंदा बाळकृष्ण शेवाळे (वर्षे ४०) या युवकाने पत्नी आणि दोन लहान मुले यांना संपवून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना आज (दि ३० नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा शेवाळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सकाळी व्हॉट्स ॲपवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेट्स टाकले होते. हे स्टेट्स शेवाळे यांच्या लहान भावाने पाहिले आणि त्याला काहीतरी अनुचित घडल्याची शंका आली. त्याने तात्काळ इतर नातेवाईकांना फोनद्वारे याची माहिती दिली. त्यानंतर शेवाळे कुटुंबीयांच्या निवासस्थानी गेल्यावर भयानक घटना उघडकीस आली.​

घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले. हत्या की आत्महत्या याबाबतच्या कारणांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम तपासणी करणार आहे. ​स्वतःच्या मृत्यूचे संकेत देणारा 'भावपूर्ण श्रद्धांजली' हा स्टेटस पाहिल्यानंतर, ही घटना पूर्वनियोजित असावी अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेत कोमल गोविंद शेवाळे (वर्षे ३५), ख़ुशी गोविंद शेवाळे (वर्षे ८), श्याम गोविंद शेवाळे (दीड वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.

यात युवक गोविंद शेवाळे याने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे, तर पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. देवळा पोलीस पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्यासह पोलीस घटनास्थळी उपस्थित असून अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संक्रांतीचा सण ठरला शोकांत; ट्रक अपघातात दोन बहिणींचा दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

Manoj Jarange: ना महायुतीला, ना महाविकास आघाडीला... निवडणुकीसाठी कुणालाही पाठिंबा नाही, मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका

Thursday Horoscope: व्यवसायात भरभराट होईल पण पैसाही तितकाच खर्च होईल; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

SCROLL FOR NEXT