Ashok Kharat saam tv
महाराष्ट्र

Ashok Kharat: अशोक खरातचा नवा कारनामा, महादेवाचा अवतार असल्याची थाप; करिअर घडवतो सांगत तरुणीवर लैंगिक अत्याचार

Ashok Kharat Case Update: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातविरोधात सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरातने आणखी एका तरुणीला करिअरचे आमिष दाखवत लैंगिक शोषण केले. या तरुणीली त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Priya More

Summary -

  • अशोक खरातविरोधात सातवा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

  • ‘महादेवाचा अवतार’ असल्याचा दावा करत तरुणीची फसवणूक

  • करिअरच्या आमिषाने वारंवार लैंगिक शोषण

  • एसआयटीकडून सात दिवसांपासून चौकशी सुरू

  • प्रकरणात आणखी धक्कादायक खुलास्यांची शक्यता

अभिजीत सोनवणे, नाशिक

ज्योतिषी असल्याचे सांगून १०० पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार करणाऱ्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. अशोक खरातविरोधात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात सातवा गुन्हा दाखल झाला आहे. करिअर घडवण्याच्या आमिषाने त्याने लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका पीडित तरुणीने दिली आहे.

आरोपी अशोक खरातने संमोहित करून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. स्वतःला 'महादेवाचा अवतार' असल्याचे सांगत त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. तर विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी त्याने दिली होती. जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान अशोक खरातने पीडित तरुणीवर वारंवार अत्याचार केले. भीतीमुळे पीडिता गप्प राहिली शेवटी अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर तिने धाडस करत पुढे येत याप्रकरणी तक्रार दाखल केली. अशोक खरातविरोधात महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे ७ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरातची एसआयटीकडून सलग सातव्या दिवशी चौकशी सुरू आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांच्या उपस्थितीत गोपनीय ठिकाणी त्याची चौकशी केली जात आहे. सकाळी १० वाजता चौकशीला सुरुवात झाली. कालच नाशिक न्यायालयाकडून अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली. कस्टडी मिळताच दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचा वेग वाढवला आहे. या तपासात पोलिस लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कवर फोकस करत आहेत. या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Raja Shivaji Advance Booking : 'राजा शिवाजी'ची तुफान क्रेझ, रितेश देशमुखच्या चित्रपटाची रिलीज आधीच बंपर कमाई

Pregnancy Signs And Symptoms: प्रेग्नंसीची सुरूवातीची लक्षणे काय? महिलांनी घरी कसं ओळखायचं? जाणून घ्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार; तरुणाचा खून केला, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुचाकीसह पेटवला

Maharashtra Accident: महाराष्ट्राचे धक्कादायक वास्तव! दररोज ४४ जणांचा अपघाती मृत्यू, या ५ जिल्ह्यात सर्वाधिक अपघात; आकडे वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT