Mumbai Police: मुंबई हादरली! पोलिस मुख्यालयात पोलिसाची आत्महत्या, सुसाइड नोटमधून धक्कादायक कारण समोर

Mumbai Police End Life: मुंबईतल्या कलिना पोलिस मुख्यालयामध्ये पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसाने लिहिलेल्या सुसाइड नोटमधून धक्कादायक कारण समोर आले आहे.
Mumbai Police: मुंबई हादरली! पोलिस मुख्यालयात पोलिसाची आत्महत्या, सुसाइड नोटमधून धक्कादायक कारण समोर
Mumbai Police End LifeSaam tv
Published On

Summary:

  • मुंबईमध्ये पोलिसाची आत्महत्या

  • कलिना येथील पोलिस मुख्यालयातील घटना

  • पोलिसाच्या आत्महत्येमुळे खळबळ

  • आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट सापडली

मुंबईमध्ये पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना घडली. कलिना पोलिस मुख्यालयातील निवासस्थानी या पोलिसाने गळफास घेत आयुष्य संपवलं. भैय्यासाब भीमराव व्हावळे असं आत्महत्या केलेल्या या ३२ वर्षीय पोलिसाचे नाव होते. भैय्यासाब नुकताच मुंबई पोलिस दलात भरती झाला होता. प्रेम प्रकरणातून त्याने आयु्ष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून या पोलिसाने आत्महत्या केली.

मिळाललेल्या माहितीनुसार, ३२ वर्षांचा भैय्यासाब व्हावळे याची ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलिस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. तो मुळचा परभणीचा होता. कलिना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात तो कार्यरत होता. १५ मार्च रोजी त्याने प्रशिक्षण केंद्रात गळफास घेत आयु्ष्य संपवलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. या पोलिसाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाइड नोटमध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचं कारण लिहिले.

Mumbai Police: मुंबई हादरली! पोलिस मुख्यालयात पोलिसाची आत्महत्या, सुसाइड नोटमधून धक्कादायक कारण समोर
Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार

पोलिसाच्या खिशामध्ये पोलिसांना सुसाइड नोट सापडली. या सुसाइड नोटमध्ये त्याने त्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांची नावं लिहिली होती. या पोलिसाचे नांदेडच्या हदगावमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. पण तरुणीच्या घरच्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध केला. त्यामुळे तिचे घरचे पोलिस भैय्यासाब व्हावळे याचा मानसिक छळ करत होते. तरुणीचे वडील त्याला सतत जीवे मारण्याची धमकी देत होते.

Mumbai Police: मुंबई हादरली! पोलिस मुख्यालयात पोलिसाची आत्महत्या, सुसाइड नोटमधून धक्कादायक कारण समोर
Mumbai : भयंकर घटना, ४० फेरीवाल्यांनी तरूणाला बेदम मारलं, कारण वाचून तुम्हालाही येईल राग

पोलिसाच्या प्रेयसीच्या आईने 'तू आत्महत्या कर नाही तर तुझी नोकरी घालवू' अशी धमकी दिली होती. तिच्या आई-वडिलांनी तिचे दुसरीकडे लग्न लावण्याचे ठरवले होते. याच त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले. या प्रकरणी पोलिसाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील वाकोला पोलिसांनी भैय्यासाबच्या प्रेयसीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

Mumbai Police: मुंबई हादरली! पोलिस मुख्यालयात पोलिसाची आत्महत्या, सुसाइड नोटमधून धक्कादायक कारण समोर
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भयंकर अपघात, ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या, ३ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com