NASHIK CRIME: FRIEND KILLS FRIEND DURING DRUNKEN FIGHT IN DEOLALI, ACCUSED ARRESTED Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime : भयंकर! दारू प्यायले, नशेत मित्राने काढला मित्राचा काटा; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News : नाशिकच्या देवळाली गावात दारू पिताना झालेल्या वादातून विशाल माळवे यांची हत्या करण्यात आली. आरोपी मित्र योगेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या देवळाली गावात दोन मित्रांमधील वादातून हत्या

  • दारू पिताना झालेल्या क्षुल्लक वादातून हत्या

  • तरुणाचा जागीच मृत्यू

  • उपनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला

अभिजित सोनावणे, नाशिक

नाशिकच्या देवळी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मित्रांमध्ये दारू पिताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने रौद्र रूप घेतले. या वादातून एकाची हत्या करण्यात आली. आरोपी तरुण आणि मृत तरुण फार जवळचे मित्र होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.विशाल माळवे असे मृत तरुणाचे नाव असून योगेश गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल माळवे आणि योगेश गायकवाड हे दोघे मित्र गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे देवळाली गावात एकत्र बसून दारू पित होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद हळूहळू वाढत गेला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात योगेश गायकवाडने जवळ असलेल्या हत्याराने विशाल माळवे याच्यावर सपासप वार केल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विशाल गंभीर जखमी झाला.

हल्ला इतका गंभीर होता की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा केले, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित आरोपी योगेश गायकवाड याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणात पोलिसांचा तपास योग्य- देवेंद्र फडणवीस

वटपौर्णिमेला महिलांनी या 3 रंगाच्या साड्या चुकूनही नेसू नये

मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल! बड्या मंत्र्यांना डच्चू; ठाकरेसेना फोडणाऱ्या शिंदेंसेनेला बक्षीस, श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद?

High cholesterol: ही ६ ड्रिंक्स रक्तवाहिन्यांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढतील बाहेर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का! 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांनाही अर्जाची संधी नाही

SCROLL FOR NEXT