Nashik Crime News Young Man threw a 10th class girl form the building fifth floor Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर प्रेम; तरुणाने दहावीच्या विद्यार्थिनीला इमारतीवर नेलं अन्...

Nashik Crime News: नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पाचमजली इमारतीच्या गच्चीवरून ढकलून दिलं.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पाचमजली इमारतीच्या गच्चीवरून ढकलून दिलं. या घटनेत अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे.  (Latest Marathi News)

विनायक सुरेश जाधव (वय १९, रा. घोटी) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी ही इंदिरानगर (Nashik News) परिसरातील रहिवाशी आहे.

काही दिवसांपूर्वी तिची ओळख इन्स्टाग्रामवरून विनायक याच्याशी झाली होती. दरम्यान, बुधवारी (दि. ३१) रात्री विनायक आणि मृत विद्यार्थिनी इंदिरानगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर गप्पा मारत होते.  (Maharashtra Political News)

विनायक आणि तिच्यात वाद (Crime News) झाला. या वादातून त्याने विद्यार्थिनीला पाचव्या मजल्यावरून ढकलून दिलं. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) विनायक याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

SCROLL FOR NEXT