HSC Exam: हस्ताक्षर बदल प्रकरणी पोलिसांनी संभाजीनगर बोर्डाकडून मागवल्या 372 उत्तरपत्रिका; 2 शिक्षक अद्याप फरार

या घोटाळ्यात आणखीही काही जणांवर संशय असल्याने पोलीस उत्तरपत्रिकांची पाहणी करणार आहेत.
HSC Exam
HSC ExamSaam Tv
Published On

Chhatrapati Sambhaji Nagar News: बारावीच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर बदल प्रकरणी आता पोलिसांनी ३७२ उत्तरपत्रिका संभाजीनगर बोर्डाकडून मागवल्या आहेत. गुन्हा दाखल झालेले दोन शिक्षक अद्याप फरारच आहेत. मात्र, या घोटाळ्यात आणखीही काही जणांवर संशय असल्याने पोलीस उत्तरपत्रिकांची पाहणी करणार आहेत. (Latest Marathi News)

HSC Exam
Political News: संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर शरद पवारांनी दिलं असं उत्तर म्हणाले, 'मी…'

बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षरात बदल प्रकरणात दोन शिक्षकांवर संशयाची सुई आहे. मात्र यात आणखी काही जणांचा समावेश असू शकतो, असा संशय बोर्डातील समितीने व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास करण्यासाठी पोलिसांनी ३७२ विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिका बोर्डाकडून मागवल्या आहेत. (Marathwada News)

बारावीच्या परीक्षा सरू झाल्यानंतर तीनच दिवसांनी उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू झाली. बारावी भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील घनवट आणि पिंपळा येथील अध्यापक राहुल भगवान उसारे आणि मनीषा भागवत शिंदे यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी १३ मार्च रोजी उत्तरपत्रिका तपासून जमा करणे अपेक्षित होते.

वारंवार सांगूनदेखील त्यांनी महिनाभर उशिरा ८ एप्रिल रोजी जमा केल्या. उत्तरपत्रिकांत दोन वेगवेगळी हस्ताक्षरे आढळली. विद्यार्थ्यांची सुनावणी होऊन सर्व प्रकार समितीसमोर आल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल केला.

HSC Exam
Odisha Train Accident: रेल्वे अपघातानंतर पदाचा राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर अश्विनी वैष्णव म्हणाले…

दोन्ही शिक्षक सध्या बेपत्ता आहेत. बोर्डाने विद्यार्थ्यांची चौकशी केल्यानंतर आता त्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पोलिस करणार आहेत. विभागीय मंडळाकडे पोलिसांनी या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मागितल्या आहेत. उत्तरपत्रिकांतील दोन हस्ताक्षरप्रकरणी चौकशी फर्दापूर पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिस उत्तरपत्रिका तपासतील. नंतर संबंधित विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, असे फर्दापूर पोलिसांकडून (Police) सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com