Odisha Train Accident: रेल्वे अपघातानंतर पदाचा राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर अश्विनी वैष्णव म्हणाले…

Ashwini Vaishnaw News: बालासोरमध्ये तीन गाड्यांच्या धडकेत आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Ashwini Vaishnaw News
Ashwini Vaishnaw NewsSaam Tv

Odisha Balasore Train Accident News: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे. शेकडो प्रवाशांच्या मृत्यूला अश्विनी वैष्णव हे जबाबदार असून राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.याला आता अश्विनी वैष्णव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

Ashwini Vaishnaw News
Parbhani Crime News: कौटुंबिक वाद शिगेला; ३२ वर्षीय महिलेने उचललं टोकाचं पाऊल

ही वेळ राजकारण करण्याची नाही अशा शब्दांता त्यांनी विरोधकांनी फटकारलं आहे. बचावकार्यावर आमचे लक्ष असून बचावकार्य पूर्ण वेगाने सुरू आहे. पंतप्रधानांनी भेट देत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधानांनी (Narendra Modi) वेगाने काम करण्यास सांगितले आहे. घटनेची चौकशी करून कारवाई केली जाईल. 15 ते 20 दिवसांत तपास अहवाल सादर केला जाईल अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. (Odisha News)

पुढे बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, लवकरच तपास अहवाल सादर केला जाईल त्यात सर्व काही समोर येईल. अशा प्रकारच्या अपघातात मानवी संवेदनशीलता खूप महत्वाची आहे. आमचं पहिलं काम बचावकार्याचं आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

Ashwini Vaishnaw News
Odisha Train Accident: 'कोरोमंडल एक्स्प्रेस पूर्ण वेगात होती, तिला थांबवणे शक्य नव्हते', रेल्वे अपघाताबाबत महत्वाची माहिती आली समोर

आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू

बालासोरमध्ये तीन गाड्यांच्या धडकेत आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शाक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंतप्रधानांनी दिली घटनास्थळी भेट

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट दिली.पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सकाळी अपघाताची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मोदींसोबत अनेक बडे नेते आणि अधिकारीही उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना रेल्वेमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांनी परिस्थितीची माहिती दिली. घटनास्थळी पंतप्रधान मोदींनी मदत आणि बचावकार्य करणाऱ्या जवानांशी संवाद साधला. रेल्वे अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दोषींवर कारवाई होणारच, त्यांना सोडलं जाणार नाही, असं म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com