Nashik Crime News Nashik Police
Nashik Crime News Nashik Police  SAAM TV
महाराष्ट्र

धक्कादायक! हॉलमध्ये ४ वर्षीय चिमुकली झोपली होती; इतक्यात 'तो' घरात शिरला अन्...

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख -

नाशिक: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात हॉलमध्ये झोपलेल्या ४ वर्षीय मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीने केला. याबाबतची तक्रार त्या मुलीच्या आजीने पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून, त्याचा शोध सुरू आहे.

नाशिकमध्ये (Nashik) ४ वर्षांच्या मुलीला झोपेत असतानाच पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले. नाशिकच्या शरणपूर रोड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आजीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीत शरणपूर रोड येथील बेतले नगरात एका घरात हॉलमध्ये तिची मुलगी आणि नात झोपलेल्या होत्या. तर तक्रारदार महिला किचनमध्ये काम करत होती. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिच्या ४ वर्षांच्या नातीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. (Nashik Crime News )मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला. या प्रकरणी महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ३६३ आणि ५११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT