Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : रक्षाबंधनानिमित्ताने कुटुंब गावी; बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

Nashik News : बंद घरांची पाहणी करत संधी साधत चोरटे घरात घुसून ऐवज लांबवत आहेत. अशात देवळा तालुक्यात भर दुपारच्या सुमारास घरफोडी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: रक्षाबंधननिमित्ताने घराला कुलूप लावून कुटुंबीय गावी आले होते. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यानी घरातून लाखो रूपयांचा ऐवज लांबविला आहे. सदरची घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी येथे घडली असून दिवसा ढवळ्या बंद घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील मेशी या गावात घरफोडीच्या घटना घडली आहे. नामदेव वेद शिरसाठ हे रक्षाबंधनासाठी गावी गेले होते. दरम्यान ते गावाहून परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. तर दरवाजा उघडून घरात गेले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचताच त्यांनी पाहणी करत पंचनामा केला.  

सव्वादोन लाखांचा ऐवज लांबविला 

दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी रोख रकमेसह सोन चोरुन नेल्याची घटना उघडीस आली आहे. यात २ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम, याशिवाय तीन तोळे सोने असा लाखोंचा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस घटनेचा तपास करीत आहे. अद्याप चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी ताब्यात 
नांदेड
: घरपोडी करून दहशत वाजवणाऱ्या टोळीवर नांदेड गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. टोळीतील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीकडून नायगाव व रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरी घरफोडी प्रकारात सोने व चांदीचा असा मिळून १ लाख ६२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात बारा मेळा गणपतीचे आज विसर्जन

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?

Maratha Reservation: छगन भुजबळांच्या नाराजीवर सुनील तटकरे म्हणाले.. VIDEO

OBC Reservation: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे २- २ सदस्य; ओबीसी समाजाची उपसमिती काय काम करणार?

Tapalwadi Waterfall : पावसात लांब कशाला? मुंबईतच वसलाय स्वर्गाहून सुंदर टपालवाडी धबधबा

SCROLL FOR NEXT