Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : नकली बंदूक घेऊन घुसला; चिमुकल्यांच्या हिंमतीने डाव फसला, गावकऱ्यांनी चोरट्याला धो-धो धुतला

Nashik News : घरात कोणी नसल्याची खात्री होताच त्याने घरातील दोघा लहान मुलांना नकली बंदुकीचा धाक दाखवत मोबाईल व कपाटातील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरात असलेल्या दोघा मुलांना या चोरट्यानी नकली बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. यानंतर मुलांना पळवून नेत पैशांची मागणी केली. मात्र त्याचा डाव फसला. यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडत चांगलाच चोप दिला. 

नाशिकच्या (Nashik) सटाणा तालूक्यातील किकवारी शिवारात एक इसम घरी येऊन घरी कोण कोण आहे. याची विचारपूस करीत घराजवळ आला. दरम्यान घरात कोणी नसल्याची खात्री होताच त्याने घरातील दोघा लहान मुलांना नकली बंदुकीचा धाक दाखवत मोबाईल व कपाटातील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. तसेच दोघा मुलांना जवळच्या मक्याचा शेतात घेऊन गेला. तेथून घरातून चोरलेल्या मोबाईल वरुन मुलांच्या वडिलांकडे दहा लाखाची रक्कम द्या नाहीतर तुमच्या मुलाला मारु अशी (Crime News) धमकी दिली. 

सापडला गावकऱ्यांच्या ताब्यात 

बाहेर गेलेल्या मुलाच्या वडिलांनी आपल्या भावाला याची माहिती दिली असता मुलाच्या काकांनी त्यांचा शोध घेत आवाज दिला. आवाज एकटाच मुलांनी त्यांना साद घातली. यानंतर चोरटा मोबाईल व बॅग तेथेच टाकून पळून जात असतांना गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करतपकडले व त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

SCROLL FOR NEXT