Hingoli News : संतापजनक.. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला २ दिवस ताटकळत ठेवले; हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

Hingoli News : हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेला रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांनी ४८ तास उपचाराविना रुग्णालयात ताटकळत ठेवले आहे
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली : प्रसूतीच्या वेदना होत असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेवर उपचार करण्यास दिरंगाई करण्यात आली. या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी सदर महिलेला तब्बल ४८ तास ताटकळत ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या महिलेला नांदेडच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

राज्यात महिलांना वेळेत आरोग्य सोईसुविधा मिळाव्या यासाठी सरकारने घोषणा केल्या आहेत. आपला दवाखाना या योजनेच्या माध्यमातून सरकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य व्यवस्था पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगत आहे, मात्र (Hingoli) हिंगोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडविणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीच्या कळा जाणवत असल्याने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेला रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांनी ४८ तास उपचाराविना रुग्णालयात (Hospital) ताटकळत ठेवले आहे. आशामती ज्ञानेश्वर घुगे असं या महिला रुग्णाचे नाव असून औंढा तालुक्यातील गोजेगाव येथून ही महिला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती, 

Hingoli News
Hingoli News : वेल्डिंग काम करताना घडले भयंकर; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर

पेशी कमी झाल्याचे सांगत नांदेड नेण्याचा सल्ला 

रुग्णालयातील डॉक्टरांनी पहिल्या दिवशी सदर महिलेला प्रसुतीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या दिवशी या महिला रुग्णाला रक्ताची आवश्यकता असून रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्याचे कारण देत नांदेडच्या (Nanded) रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान नातेवाईकांनी महिलेचा ब्लड ग्रुप असलेले रक्त मिळविण्यासाठी परभणी व नांदेड गाठत रक्ताच्या दोन बॅग उपलब्ध केल्या. मात्र डॉक्टरांनी प्रसूतीच्या असह्य वेदनांनी त्रस्त असलेल्या आशामती घुगे यांच्या शरीरातील पेशी कमी झाल्याचे सांगत तातडीने नांदेडच्या रुग्णालयात हलवा अन्यथा महिलेच्या जीवाला धोका होईल; अशी भीती नातेवाईकांना घातली. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी या महिलेला तातडीने नांदेडच्या रुग्णालयात भरती केले आहे. 

Hingoli News
Latur Politics : लातूरमध्ये राजकीय वातावरण तापलं; अमित देशमुखांच्या विधानाने मविआत वादाचे संकेत

त्या डॉक्टरांची चौकशी सुरु 

दरम्यान हा संपूर्ण प्रकार हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या निदर्शनास आला. या नंतर प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टर विरोधात कार्यवाही करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या असून, सदरील महिलेवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातच उपचार करता आले असते; अशी माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा सलाईन वर गेल्याचं अधोरेखित झाल असून, आरोग्य ववस्थेचा बोजवारा उडाल्याच देखील स्पष्ट झाल आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com