Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime : नवरा-बायकोच्या वादाचा भयानक अंत; पत्नीची हत्या करून पतीने स्वत:लाही संपवलं, हृदयद्रावक घटना!

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.

Satish Daud

तबरेज, शेख साम टीव्ही

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. नाशिकच्या चुंचाळे परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी पती-पत्नीचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. (Latest Marathi News)

मनीषा भुजंग तायडे आणि भुजंग अश्रू तायडे, अशी मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी (Police) दोघांचेही मृतदेह त्यांच्या चुंचाळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पती भुजंग आणि पत्नी मनीषा यांच्यात कौटुंबीक कारणातून सतत वाद होत होते.

पती भुजंग याला पत्नी मनीषाच्या चारित्र्यावर संशय (Crime News) होता. यातून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. दरम्यान, दोघांमध्ये बुधवारी पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की पती भुजंग याने पत्नी मनीषा हिची गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर त्याने किचनमधील फॅनला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. बराच वेळ होऊनही दोघे घराचे दार उघडत नसल्याने शेजारच्यांनी खिडकीतून डोकावून बघितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच, मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची (wife) हत्या करत आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial: तेजश्री प्रधान आणि रेश्मा शिंदेच्या मालिकेत रंगली स्पर्धा; कोणती मालिका ठरली प्रेक्षकांची फेव्हरेट? पाहा TRP यादी

Nashik : नाशिक हादरले! जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह

Smartphone Tips : मोबइलवर कॉल आला, गाणी वाजली, पण आवाज कमी येतोय; काही सेकंदात असा करा प्रॉब्लेम सॉल्व्ह

भारताची मान जगात उंचावली! वैभव जैन यांनी 'The Button' मधून दिला भविष्याचा मंत्र, AI चांगलं की वाईट जगाला सांगितलं

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

SCROLL FOR NEXT