Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime : बाप बनला हैवान! पोटच्या मुलीवर केले अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना

नाशिकमधून बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik Crime News : नाशिकमधून बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम बापानेच आपल्या सख्या मुलीलाच वासनेचा बळी बनवलं आहे. मुलीला बदनामीची धमकी देत नराधम बापाने तिच्यावर सलग पाच वर्ष अत्याचार केले. बापाकडून होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या वेदना असह्य झाल्याने पीडित मुलीने थेट अंबड पोलिसांत तक्रार दिली. (Latest Marathi News)

याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून नराधम बापाला अटक केली आहे. नाशिकमधील (Nashik) डीजीपीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. नराधम बापाने आपल्याच मुलीचे लचके तोडल्याचं समोर येताच, परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, घरात आई, बहीण आणि भाऊ नसतांना नराधम बाप संधी साधत अत्याचार करायचा. गेल्या पाच वर्षांपासून बापाकडून हे कृत्य सुरू होते.

याची वाच्यता कुणाकडे केल्यास आपलीच बदनामी होईल म्हणून पीडित मुलीला पित्याकडून धमकी दिली जात होती. 2016 पासून नराधम बापाचं हे क्रूर कृत्य (Crime News) सुरू होतं, असं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. दिवसेंदिवस बापाचं हे कृत्य वाढतच असल्याने पीडितेने अखेर अंबड पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून नराधम बापास बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT