Junnar Crime News  saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: धक्कादायक! संजय राऊतांच्या हॉटेल शेजारी कंपनी मॅनेजर रक्ताच्या थारोळ्यात; अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी केले वार

चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी वार केल्याने ते गंभीर जखमी केले होते.

साम टिव्ही ब्युरो

Nashik News: नाशिकमध्ये कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी मॅनेजरची चारचाकी कार पळवून नेली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या काही अंतरावर खासदार संजय राऊत हे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. (Latest Marathi News)

पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगण जवळ ही घटना घडली. कंपनीत मॅनेजर असलेल्या योगेश मोगरे यांची चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले होते. त्यांनतर त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या हल्ल्यात मॅनेजर योगेश मोगरे यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश मोगरे हे आपले काम उरकल्यानंतर गरवारे येथील सर्विस रोडवरून पाथर्डी फाट्याकडे एमएच १५ एच.वाय ४९५९ क्रमांकाच्या चारचाकी कारने जात होते. यावेळी हॉटेल आंगण समोर अज्ञात दोन गुंडांनी त्यांची गाडी अडवून थांबवले आणि त्यांनी धारदार कोयते हत्यारे काढून अंगावर,पाठीवर तसेच मानेवर सपासप वार केले.

रिक्षा चालक आला मदतीला धावून

योगेश मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना एका रिक्षा चालकाने त्यांना पाथर्डी फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव साहेब आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पहाणी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेबाबत रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office ची जबरदस्त योजना, तुम्हाला करेल मालामाल; गुंतवा फक्त ३३३ रुपये, मिळतील १७ लाख

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गट समन्वय बैठकीत गटबाजी उफाळली

Nag Panchami Rangoli: नाग पंचमीला दारात काढा या सुंदर रांगोळ्या, घराची वाढेल शोभा

Jalna Crime : क्रीडा प्रबोधनीत चार विद्यार्थिनींचा विनयभंग; जालन्यातील धक्कादायक प्रकार, क्रीडा शिक्षक ताब्यात

Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना सारखं ग्लॅमरस दिसायचं आहे? मग कारा 'या' फॅशन टिप्स फॉलो

SCROLL FOR NEXT