Crime News : गोरेगाव पोलिसांची दमदार कामगिरी; काही तासातच सोनसाखळी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

गोरेगाव बस स्टैंडवर बसची वाट पाहत बसलेल्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरून हे चोरटे फरार झाले होते.
Crime News
Crime NewsSaam tv

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरून पळ काढणाऱ्या तीन सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. हे तिघेही सराईत चोर आहेत. गोरेगाव बस स्टैंडवर बसची वाट पाहत बसलेल्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरून हे चोरटे फरार झाले होते.(Mumbai Police)

याविषयीची तक्रार फिर्यादीने गोरेगाव पोलिसांना दिल्यानंतर गुन्हा दाखल करून गोरेगाव पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींची ओळख पटली.

Crime News
Raj Thackeray यांनी दाखवलेल्या त्या अनधिकृत माजारीवर Abu Azmi यांची प्रतिक्रिया.. | SAAM TV

त्यानंतर या तीनही सोनसाखळी चोरांना गोरेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेली दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि चोरीसाठी वापरलेली स्कुटी देखील जप्त केली आहे.

जिरेन्द्र नर्सिंग राव कोया (22), ऋषिकेश दळवी उर्फ कल्याबाबू (22) आणि आशिष यादव (21)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहापेक्षा अधिक सोनसाखळी चोरी आणि इतर गुन्ह्यांची नोंद आहे.

Crime News
Virar Crime News : प्रियकराला झाडाला बांधून १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; विरारमधील संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com