Crime News Saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! निर्घृणपणे गळा चिरून परप्रांतीयाची हत्या; हल्लेखाेर पसार

अंबडच्या संजीवनगरात घडली घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - अंबड (Ambad) येथील संजीव नगर परिसरात मेळ्याच्या ठिकाणी चार जणांनी एका परप्रांतीयाचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना रात्री घडली. दरम्यान, वेळीच उपचार न मिळाल्याने अतिरक्तस्त्राव हाेऊन मृत्यू झाला. गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना उपस्थित नागरिक त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. ताे एकटाच विव्हळत हाेता. त्यानंतर काही वेळाने त्याला जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आला मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदरे आलम शब्बीर शेखअसे मृत तरुणाचे नाव आहे.

हे देखील पाहा -

अंबड लिंक रोडवरील संजीव नगर मधील मेळाव्यात ही घटना घडली आहे. या घटनेतील अनोळखी टोळके पसार झाले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीव नगर येथील राहणारा सदरे आलम या तरुणावर चार ते पाच संशयितांनी हल्ला करत त्याचा गळा चिरुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ताे काही काळ एकटाच येथे विव्हळत हाेता. काही नागरीकांनी त्याला रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तर काहींनी पाेलिसांना कळवले.

यानंतर गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्याचा गळ्यातील कंठच चिरल्याने त्याला बाेलता येणे कठीण झाले हाेते. बोलता येत नसल्याने संशयितांचे नाव निष्पन्न करण्यास पोलिसांना अडचन आली. मात्र, रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्लेखाेर पसार असून त्यांचा शाेध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT