Nashik Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: पोलिस असल्याचे सांगून तरुणीला सोबत नेलं; शिर्डी, नाशिकसह ३ ठिकाणी केला बलात्कार

Nashik Police: नाशिकमध्ये पोलिस असल्याचे सांगून तरुणीवर बलात्कार करण्याची घटना घडली. वेगवेगळ्या ३ ठिकाणी नेऊन आरोपींनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे नाशिक हादरले.

Priya More

Summary:

  • पोलिस असल्याचे सांगून तरुणीवर बलात्कार

  • शिर्डी, नांदगाव आणि नाशिकमध्ये नेऊन तरुणीवर बलात्कार

  • फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केलं ब्लॅकमेलिंग

  • या घटनेमुळे नाशिक हादरले

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर याठिकाणी एक एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच नाशिकमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिस असल्याचे भासवून आरोपीने तरुणीला ३ ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे नाशिक हादरले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील एका तरुणीला पोलिस असल्याचे भासवत आणि आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने बलात्कार केला. या तरुणीवर नांदगाव, शिर्डी आणि नाशिक रोड याठिकाणी नेऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी नांदगाव येथील आरोपी संदिप कौतिक बेंडकेविरोधात नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

आरोपी संदिपने कॉलेजचे हरवलेले ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीशी ओळख वाढवली होती. पीडितेला ५ महिन्यात नांदगाव, शिर्डी आणि नाशिक रोड अशा विविध ठिकाणी नेत आरोपीने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केल्याची फिर्याद नांदगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. नांदगाव पोलिसांच्या पथकाने पीडितेला सोबत नेत या प्रकरणाशी संबंधित शिर्डीतील हॉटेलची तपासणी करत पंचनामा केला. आरोपी संदिप बेंडके हा फरार असून नांदगाव पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT