ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा ललित पाटील याच्यासह त्याच्या तीनही आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. नाशिक येथील घरांची पोलिसांकडून झडती घेण्यात आली असून पोलिसांनी पेन ड्राईव्ह आणि मोबाईल, असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त केले आहेत. (Latest News)
पोलिसांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातील डेटा तपासला जात असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिलीय. याविषयीची माहिती पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत पाटील याला २ कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल (वय २९, रा, देहू रस्ता, मुळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचारी रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडिवाला रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस मुख्य आरोपी ललित पाटील (वय ३४), भूषण सुभाष पाटील (रा. नाशिक) आणि अभिषेक विलास बलकवडे यांचा शोध घेत आहेत. पाटील याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा वाहन चालक दत्ता डोके यालादेखील अटक करण्यात आली आहे. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचा ड्रग्जचा नाशिकमधील कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्धवस्त केलाय. भुषण हा नाशिकच्या शिंदे पळसे परिसरात हा ड्रग्सचा कारखाना चालवत होता. तब्बल तीन दिवस या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटींचे अमली पदार्थसह पकडलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.