Nashik Sinnar News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : वर्दीचा रुबाब आणि AI चा डर्टी गेम, महिलांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Nashik Sinnar News : नाशिकमध्ये AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट पोलीस ओळख तयार करत महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून ३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये AI चा गैरवापर करून फसवणूक

  • बनावट पोलीस ओळख तयार करून महिलांना जाळ्यात ओढले

  • पीडितेकडून ३ लाख रुपये उकळले

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला

अभिजित सोनावणे, नाशिक

तंत्रज्ञानाचा वापर खरतर प्रगतीसाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी होतो. मात्र अलीकडे याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये AI च्या मदतीने स्वतःचे पोलीससारखे दिसणारे गणवेशातील बनावट फोटो तयार करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याला वावी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव आसिफ तडवी असे आहे. आसिफने सोशल मीडियावर पोलीस अधिकारी असल्याचे भासवून बनावट नावाने खाती उघडली होती. या बनावट अकाऊंटवरून त्याने अनेक महिलांना पोलीस दलात असल्याचे खोटे सांगून त्यांच्यावर आपली छाप पाडली आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याने AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे पोलीस ठाण्यात बसलेले आणि पोलीस गणवेशातील अत्यंत हुबेहूब दिसणारे फोटो तयार केले होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एका महिलेशी संपर्क साधला. खाकी वर्दीचा रुबाब दाखवून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एकदा विश्वास संपादन केल्यानंतर, कधी घरगुती अडचणींचे कारण तर कधी पोलीस ट्रेनिंगचा बहाणा सांगून त्याने या महिलेकडून तब्बल ३ लाख रुपये उकळले. जेव्हा पीडित महिलेने अधिक पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा तडवीने आपले खरे रूप दाखवले. त्याने AI च्या मदतीने पीडित महिलेचे आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

आपली फसवणूक झाल्याचे समजताच पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. संशयित आसिफ तडवी हा महिलेला भेटण्याच्या बहाण्याने आला असता, वावी पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrit Bharat Express: मुंबईतून धावणार अमृत भारत एक्स्प्रेस, थांबे कुठे अन् तिकीट किती असणार? वाचा A टू Z माहिती

Goa Tourism : गोव्यातील 'ही' ठिकाणे जणू काश्मीरच, भर उन्हाळ्यातही भरेल हुडहुडी

Viral Video : कडेवर बाळ घेऊन महिला धावत्या ट्रेनमधून उतरली, तोल गेला अन्...काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: अंगावर पेट्रोल ओतून तरुणाला संपवण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, चिखली पोलिसांकडून दोघांना बेड्या

Exit Polls: पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार? ४ राज्यात भाजप तर एका राज्यात काँग्रेसची सत्ता, जाणून घ्या एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT