Nashik Crime Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक घटना; धुडगूस घालणाऱ्यांना टोकलं; मद्यपींनी केली लष्करातून निवृत्त झालेल्या जवानाची हत्या

Nashik Crime : म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीता सरोवर परिसरात लष्कराच्या निवृत्त जवानाची हत्या झाल्याची घटना घडलीय. प्रकरणात म्हसरुळ पोलिसांनी दोघा संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

Bharat Jadhav

Nashik Crime :

भररस्त्यात वाद घालत धुडगूस घालण्यापासून रोखल्याने मद्यपी तरुणांनी लष्करातील निवृत्त जवानाची हत्या केली. ही खळबळजनक घटना म्हसरुळ-आडगाव लिंक रोडवर घडली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Latest News)

रवीदत्त राजेंद्र चौबे (वय ४२) असे खूनाच्या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. चौबे हे भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले होते. म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीता सरोवर परिसरात ही घटना रात्री साडेसात ते ८ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर म्हसरुळ पोलिसांनी दोघा संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी चौबे हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सहकुटुंब कारने जात होते. त्यावेळी सुरभी कंपनीसमोर दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र त्यापैकी एकाने चौबे यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने चौबे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती म्हसरुळ पोलिसांना मिळाली त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी चौबे यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरात सलग दुसऱ्या दिवशीही हत्येचीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तर, तीनच दिवसांपूर्वी शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार संदीप कर्णिक यांनी घेतलाय. त्यांच्या पुढे अशा गुन्हेगारांना लगाम घालण्याचं आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT