Solapur Crime News: सरकारी नोकरी वाचवण्यासाठी पोटच्या मुलीला दिलं दत्तक; पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हायकोर्टात याचिका

Solapur News: पोलीस निरीक्षकांवर आरोप आहे की, त्यांना आधी दोन मुली होत्या आणि पुन्हा त्यांना तिसरा मुलगा झाला. मुलगा हवा म्हणून त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलीला दत्तक दिले होते.
 Crime news
Crime news Saam Tv
Published On

Solapur:

नोकरी वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन केल्याची घटना सोलापूर (Solapur) येथून समोर आली आहे. २००५ नुसार दोनपेक्षा जास्त मुलं जर सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. आपली नोकरी वाचवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यांनी मुलांबाबत खरी माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Crime news
Buldhana Crime News: बुलडाणा हादरलं! चॉकलेटचे आमिष दाखवून तरुणाकडून अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार

मिळालेल्या अधिक माहितीनुसार,सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. बार्शी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याविरोधात २१ सप्टेंबरला याचिका दाखल करण्यात आलीये. बार्शी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याविरोधात दाखल याचिकेवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल, अशी माहिती अॅड. तृणाल टोणपे यांनी दिली.

गिरीगोसावी हे महाराष्ट्र पोलीस विभागात १९९८ पासून कार्यरत आहेत. सध्या ते बार्शी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. 'महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ नुसार दोनपेक्षा जास्त मुलं जर सरकारी नोकरांना झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

या पोलीस निरीक्षकांवर आरोप आहे की, त्यांना आधी दोन मुली होत्या आणि पुन्हा त्यांना तिसरा मुलगा झाला. मुलगा हवा म्हणून त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलीला दत्तक दिले होते. त्यानंतर आपल्याला मोठी मुलगी आणि लहान मुलगा अशी तीनच अपत्य असल्याचे सांगितले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

 Crime news
Desi Jugad Video: शेतकरी पुत्राची कमाल! तलावातलं पाणी काढण्यासाठी केला भन्नाट जुगाड; VIDEO पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com