Nashik Latest News Saamtv
महाराष्ट्र

Nashik Crime: जिगरी मित्रांनीच केला घात... किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी....

Nashik Crime News: दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात भर चौकात तरुणावर सपासप वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आणखी एका भयंकर हत्येने नाशिक शहर पुन्हा हादरुन गेले आहे. शहरातील कार्बन नाका परिसरात तरुणाची चाकूने वार करत हत्या झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या (Nashik) कार्बन नाका सातपूर परिसरात विश्वनाथ सोनवणे पाटील वय (26) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. दारु पार्टी सुरू असताना मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून शमशेर शेख आणि दिपक सोनवणे या दोघांनी मिळून सपासप वार करत या तरुणाला संपवले.

धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर अपघाताचा बनाव रचण्यासाठी या दोन्ही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयातील पोलिस चौकीवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांची विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि चौकीवर असलेले पोलिस हवालदार पि एस जगताप आणि पोलिस कॉन्स्टेबल शरद पवार यांनी दोघांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. ज्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला. दरम्यान, चार दिवसांत दुसरी हत्येची घटना घडल्याने शहरात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drone Terror : मराठवाड्यात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनचं गुढ उलगडलं; पोलिसांचा खळबळजनक खुलासा

Gujrat Road Accident: मोठी दुर्घटना! डिवायडर तोडून भरधाव बसची वाहनांना धडक; चार चिमुकल्यांसह ७ जण ठार

PM Narendra Modi : विधानसभेच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; PM मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹11000 कोटीचं 'गिफ्ट'

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

SCROLL FOR NEXT