Nashik Corona Update: नाशकात कडक निर्बंध लागू; जाणून घ्या काय सुरु?  Saam TV
महाराष्ट्र

Nashik Corona Update: नाशकात कडक निर्बंध लागू; जाणून घ्या काय सुरु?

10 वी आणि 12 वी सोडून इतर वर्ग बंद राहणार ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्याची माहिती नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. कोरोनाची तिसरी लाट पुन्हा पाय पसरायला लागली आहे. ओमिक्रॉनचाही धोका वाढत आहे. त्याच अनुषंगाने मुंबई, पुणे, नागपूर नंतर आता नाशिकमध्येही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एका मुलाला ओमिक्रॉनची (Omicron Variant) बाधा झाली आहे. 1 ली ते 9 वी शाळा सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 वी आणि 12 वी सोडून इतर वर्ग बंद राहणार ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्याची माहिती नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. (Nashik Corona Update Today Marathi)

नो वॅक्सिन, नो एन्ट्रीचे नियम आणखी कडक करावे लागतील. लस न घेतलेल्यांना शासकीय कार्यालयात प्रवेश देऊ नये. लसीचा दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही. 1 ला डोस घेतला, अशांनी दुसरा डोस घेणं आवश्यक अन्यथा लस घेऊन फायदा नाही. मालेगावात 70 टक्के लोकांनी लसीचा फक्त पहिला डोस घेतला आहे. शासकीय कार्यालयं, बाजारपेठा आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

वॅक्सिन नाही तर रेशनही नाही, असा निर्णय घेण्याचा विचार करावा लागेल असे संकते भुजबळ यांनी दिले आहेत. पुढील 8 दिवसात घेतला जाईल असेही ते म्हणाले. आरोग्य विद्यापीठात लवकरात लवकर 7 विषयांचा PG अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. काल नागपूरमध्येही निर्बंध कडक करण्यात आले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT