Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : परिचर्या महाविद्यालय काेसळण्याच्या स्थितीत; नर्सिंगच्या शेकडाे विद्यार्थीनींचा जीव टांगणीला

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या शहरातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - केंद्रीय आराेग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार (Bharti Pawar) यांच्या नाशिक (Nashik) शहरातील जिल्हा रुग्णालयात असलेले परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय केव्हाही काेसळण्याची भिती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागा कडून निधी मिळत नसल्याने दुरुस्ती चे काम होत नाही.अशी धक्कादायक माहीती समोर आली आहे. (Nashik Latest News In Marathi)

प्रशासकीय अनास्थेमुळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या 154 विद्यार्थीनीमचा जीव टांगणीला लागला असून जिल्हा रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग कागदी घाेडे नाचविण्यात व्यस्त आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयाला 44 वर्ष पूर्ण झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्यांनी जिल्हा रुग्णालयास पत्रव्यवहार करत स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण करुन हे महाविद्यालय धाेकेदायक असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेंच तत्काळ ही इमारत दुरुस्त करावी, असेही पत्रात म्हटले आहे. तरीही ठाेस कार्यवाही हाेत नसल्याचे समाेर येते आहे.नाशिक जिल्हा रुग्णालयात शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय असून त्याचे उद्घाटन सन 1978 मध्ये झाले आहे तर, शेजारील जिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारतही 40 वर्षांची झाली आहे. दरम्यान, परिचर्या महाविद्यालयातील भिंती व स्लॅप निकामी हाेत असून काही दिवसांपूर्वी मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील सिमेंटचा भाग अंगावर काेसळून एक परिचारिका जखमी झाली हाेती.

अशा गंभीर घटना घडत असताना नाशिकमधील परिचर्या महाविद्यालयासह हाॅस्टेलची इमारत धाेकेदायक स्थितीत आहे. येथेही सिमेंटने पाेपडे धरले असून काही भाग निकामी हाेत चालला आहे. इमारत अतिशय जुनी झाल्याने तिची कालमर्यादा संपली आहे. तरी देखिल या इमारतीत विद्यार्थीनी प्रशिक्षण घेत असून दुर्दैवाने केव्हाही काही अप्रिय घटना घडली तर, जबाबदार काेण असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

दुसरीकडे जिल्हा रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकमेकांनाच पत्र पाठविण्यात व्यस्त असून त्यातून इमारतीची दुरुस्ती हाेत नाहीये तर, डीपीडीसीतूनही निधी मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय अनास्थेचा कळस पहायला मिळत असून काही घटना घडण्यापूर्वीच जिल्हा नियाेजन समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सचेत हाेऊन तत्काळ उपाययाेजना राबविणे गरजेचे असल्याचे बाेलेले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsAppचं जबरदस्त नवीन फीचर! फोटो दिसणार मोशनमध्ये, वाचा माहिती

Maharashtra Live News Update: कृषी पंप चोरणारे चोरटे पकडले, ५ जण नाशिक पोलिसांच्या ताब्यात

Abhang Tukaram: जेथे जातो तेथे तू माझा सांगाती; तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा लवकरच येणार प्रेक्षकांसमोर

Solapur Crime : इंजिनिअर तरुणाने चोरल्या दुचाकी; सुटे पार्ट करत भंगारमध्ये विकले, ८ दुचाकींसह चोरटा ताब्यात

Agriculture Scheme: शेतात सिंचन व्यवस्था करायचीय? मग तयार करा शेततळं; सरकार देणार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT